कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur News) हातकणंगले (Hatkanangle) तालुक्यामधील रुई गावामध्ये पूर्ववैमनस्यातून दोन समाजाच्या वादातून तुंबळ हाणामारी झाली. या हाणामारीमध्ये सचिन बाबासाहेब कांबळे याचा मृत्यू झाला असून एक गंभीर जखमी असल्याची माहिती समोर येत आहे. गावातील एका स्पर्धेच्या निमित्ताने झालेल्या वादानंतर गेल्या वर्षभरापासून या दोन गटात वाद धुमसत होता. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून सुरू असलेला वाद मिटवण्यासाठी गेले असता झाला पुन्हा वादाची ठिणगी पडली.
कोल्हापुरात सीपीआर रुग्णालयात नातेवाईकांची मोठी गर्दी
यावेळी दोन गटात झालेल्या हाणामारीत सचिन कांबळेचा मृत्यू झाला. सचिनच्या मृत्यूनंतर कोल्हापुरात सीपीआर रुग्णालयात मृताच्या नातेवाईक आणि समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. यामध्ये महिलांचा सुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. या घटनेनंतर रुई गावामध्ये तणावपूर्ण शांतता असून कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
पोलिस असल्याचे भासवून घरात अर्धा तास थरार
कोल्हापुरात पोलिस असल्याची बतावणी करून पिस्तुलाचा धाक दाखवत व्यापाऱ्याच्या कुटुंबाला वेठीस धरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शाहुपुरी पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोल्हापूर शहरातील शाहूपुरी चौथ्या गल्लीत व्यापारी संदीप विश्वनाथ नष्टे आणि त्यांच्या कुटुंबीयांना धमकावण्याचा प्रकार सोमवारी (12 ऑगस्ट) रात्री साडेनऊ ते सव्वादहाच्या दरम्यान घडला. तब्बल अर्धा तास वेठीस धरण्याचा प्रयत्न केला. संबंधित तोतया पोलिस सीसीटीव्हीत कैद झाला आहे.नष्टे यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. व्यापारी नष्टे हे शाहूपुरी येथील चौथ्या गल्लीत कुटुंबीयांसह राहतात. सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास एक धिप्पाड इसम नष्टे यांच्या दारात आल्यानंतर नावाची विचारणा करत थेट घरात घुसला. तोंडावर मास्क असल्याने ओळखता आलं नाही.
इतर महत्वाच्या बातम्या