Weekly Horoscope 18 To 24 August 2025: ज्योतिषशास्त्रानुसार, ऑगस्ट महिन्याचा दुसरा आठवडा लवकरच सुरु होतोय. सध्या श्रावण देखील सुरु आहे. त्यामुळे या दरम्यान अनेक शुभ ग्रहांचं संक्रमण होणार आहे. या शुभ ग्रहांच्या संक्रमणाचा परिणाम या आठवड्यातील राशींना नेमका कसा होणार आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी कसा राहील? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? तूळ ते मीन राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

तूळ रास (Libra Weekly Horoscope)

तूळ राशीसाठी ऑगस्टचा दुसरा आठवडा फार फलदायी आहे. या दरम्यान  तुमच्या जोडीदाराचा पाठिंबा आणि सहकार्य मिळेल. प्रेमसंबंधांमध्ये जवळीक वाढेल. व्यवसायात भागीदारी फायदेशीर ठरेल. प्रवास शुभ आणि फायदेशीर ठरतील, तसेच उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील.

वृश्चिक रास (Scorpio Weekly Horoscope)

वृश्चिक राशीसाठी नवीन आठवडा फायद्याचा असणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्यासमोर मोठ्या संधी येऊ शकतात. तुमच्या मेहनतीचे पूर्ण फळ तुम्हाला मिळेल. जुने वाद मिटतील. गुंतवणुकीसाठी हा काळ योग्य आहे, फक्त घाई टाळा.

धनु रास (Saggitarius Weekly Horoscope)

धनु राशीसाठी नवीन आठवडा उत्तम असणार आहे.  तुम्हाला नशिबाचे पूर्ण सहकार्य मिळेल. तुम्हाला धार्मिक कार्यात रस असेल. स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबातील एखाद्याच्या आरोग्याबाबत सावधगिरी बाळगा.. 

मकर रास (Capricorn Weekly Horoscope)

मकर राशीच्या लोकांसाठी नवीन  आठवडा चांगला असणार आहे. या काळात तुम्हाला नोकरी बदलण्याची किंवा नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्याची संधी मिळू शकते. आर्थिक स्थिती मजबूत असेल. वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याची शक्यता आहे. तुमच्या जोडीदारासोबत गोडवा राहील.

कुंभ रास (Aquarius Weekly Horoscope)

कुंभ राशीसाठी नवीन आठवडा सामान्य असणार आहे. या दरम्यान तुम्हाला मित्र आणि सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल. तुम्हाला परदेश प्रवासाच्या संधी मिळू शकतात. अभ्यास आणि करिअरमध्ये प्रगती होईल. नवीन लोकांशी संपर्क साधणे फायदेशीर ठरेल.

मीन रास (Pisces Weekly Horoscope)

मीन राशीसाठी नवीन आठवडा उत्तम असणार आहे. तुम्हाला सर्जनशील कामांमध्ये यश मिळेल. इच्छित कामगिरी साध्य होईल. प्रेम संबंध दृढ होतील. कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण करण्यात तुम्हाला समाधान आणि आनंद मिळेल.

हेही वाचा :           

Weekly Horoscope 18 To 24 August 2025: ऑगस्टचा तिसरा आठवडा कसा जाणार? 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली, कोणासाठी टेन्शनचा? 12 राशींचे साप्ताहिक राशीभविष्य वाचा

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)