PM Modi Speech: आज संपूर्ण देश स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. 79 व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केले. भाषणाच्या सुरुवातीला पंतप्रधान मोदी म्हणाले की, १४० कोटी लोकांसाठी हा आनंदाचा क्षण आहे. देश एकतेची भावना सतत बळकट करत आहे. भारतातील प्रत्येक घरात तिरंगा दिसतो, मग तो वाळवंट असो, हिमालय असो, समुद्रकिनारा असो किंवा दाट लोकवस्तीचा प्रदेश असो, तो फक्त असे म्हणत आहे की आपण आपल्या प्राणांपेक्षाही प्रिय असलेल्या या भूमीला वंदन करतो, असं म्हणत त्यांनी आपल्या भाषणाला सुरूवात केली, यावेळी बोलताना मोदींनी पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यावरती आणि ऑपरेशन सिंदूरवरतीही भाष्य केलं.
मोदी म्हणाले, सीमेपलीकडून आलेल्या दहशतवाद्यांचा संहार करण्यात आला. पहलगाममध्ये धर्म विचारुन मारले गेले. त्यानंतर ऑपरेशन सिंदूर देशाच्या संतापाची अभिव्यक्ती होती. सेनादलाला आम्ही पूर्ण मुभा दिली होती. लक्ष्य आणि कारवाई त्यांनीच निश्चित केली, असं नरेंद्र मोदी म्हणाले. पाकिस्तान उद्धव्स्त झाल्यासंबंधी रोज नवनवी माहिती येतेय. पाकिस्तानची अजूनही झोप उडालेली आहे, पाकिस्तानचं प्रचंड नुकसान झालंय, असंही नरेंद्र मोदींनी सांगितले.
पहलगाम हल्ल्यावर पंतप्रधान मोदींचे विधान
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, निसर्ग आपली परीक्षा घेत आहे. आपण नैसर्गिक आपत्ती, भूस्खलन, ढगफुटी यासारख्या आपत्तींना तोंड देत आहोत. पीडितांसोबत आमच्या सहानुभूती आहेत. राज्य आणि केंद्र सरकार बचाव आणि मदत कार्यात पूर्ण ताकदीने एकत्र काम करत आहेत. आज 15 ऑगस्टला विशेष महत्त्व आहे. आज मला लाल किल्ल्यावरून ऑपरेशन सिंदूरच्या शूर सैनिकांना अभिवादन करण्याची संधी मिळाली आहे. शूर सैनिकांनी शत्रूंना त्यांच्या कल्पनेपलीकडे शिक्षा केली. सीमेपलीकडून दहशतवादी पहलगाममध्ये आले आणि त्यांनी धर्म विचारून लोकांची हत्या केली. त्यांनी पतीला त्याच्या पत्नीसमोर आणि वडिलांना त्याच्या मुलांसमोर ठार मारले. संपूर्ण देश संतापाने भरला होता आणि जगालाही या हत्याकांडाने धक्का बसला होता.
त्यानंतर पाकिस्तानची झोप उडालेली आहे
ऑपरेशन सिंदूर हा संताप व्यक्त करणारा उपक्रम होता. 22 एप्रिलनंतर लष्कराला पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले. आम्ही म्हटले होते की सैन्याने रणनीती, लक्ष्य आणि वेळ निवडावी आणि आमच्या सैन्याने ते केले जे दशकांपासून केले गेले नव्हते. त्यांनी शेकडो किलोमीटर आत प्रवेश केला आणि दहशतवादी तळांना उध्वस्त केले. त्यानंतर पाकिस्तानची झोप उडालेली आहे. पाकिस्तानमध्ये झालेला विनाश इतका प्रचंड आहे की दररोज नवीन माहिती आणि खुलासे होत आहेत. आपण अनेक दशकांपासून दहशतवादाचा सामना करत आहोत. आता आपण एक नवीन सामान्य परिस्थिती स्थापित केली आहे. आता आपण दहशतवाद्यांना आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या आणि सक्षम करणाऱ्यांना वेगळे मानणार नाही, असंही मोदींनी यावेळी म्हटलं आहे.