Weekly Horoscope 16 To 22 June 2025: ज्योतिष शास्त्रानुसार, जून महिन्याचा तिसरा आठवडा लवकरच सुरु होतोय. हा आठवडा अनेक अर्थाने खास असणार आहे. कारण या आठवड्यात मोठ मोठ्या ग्रहांच्या हालचाली देखील होणार आहेत. त्यामुळे जून महिन्याचा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? मेष आणि वृषभ राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
मेष रास साप्ताहिक राशीभविष्य (Aries Weekly Horoscope)
लव्ह लाईफ (Love Life) - मेष राशीसाठी आंधळा विश्वास नुकसान पोहोचवू शकतो. जवळच्या व्यक्तीकडून विश्वासघात होण्याची शक्यता असते आणि तुमचा निष्काळजीपणा देखील यासाठी जबाबदार असू शकतो.
करिअर (Career) - करिअरच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, या आठवड्यात तुमचा व्यवसाय किंवा करिअर पुढे नेण्यासाठी तुमच्याकडे एक प्लॅन तयार असेल. तर आता ती कृतीत आणण्याची वेळ आली आहे. लक्षात ठेवा की अर्जुनाने फक्त माशाच्या डोळ्यावर लक्ष केंद्रित केले होते, त्याचप्रमाणे लक्ष्यावरून नजर हटवू नका. तुमचे कठोर परिश्रम योग्य दिशेने जात आहेत.
आर्थिक स्थिती (Wealth) - या आठवड्यात कोणावरही आंधळा विश्वास ठेवून आर्थिक व्यवहार करू नका, अन्यथा महागात पडू शकते. कागदपत्रे नीट तपासून घ्या.
आरोग्य (Health) - गुडघ्याशी संबंधित समस्या वाढू शकतात. घरगुती उपचारांऐवजी वैद्यकीय सल्ला घ्या. वेळोवेळी तपासणी करत रहा आणि आरोग्याला हलके घेऊ नका.
वृषभ रास साप्ताहिक राशीभविष्य (Taurus Weekly Horoscope)
लव्ह लाईफ (Love Life) - वृषभ राशीसाठी रिलेशन जोडण्याची किंवा तोडण्याची घाई करू नका. भावनांऐवजी विवेकबुद्धीने वागा.
करिअर (Career) - करिअरच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, मोठी गुंतवणूक टाळणे तुमच्या हिताचे असेल. नोकरी करणाऱ्या लोकांना त्यांच्या क्षमतेनुसार संधी मिळणार नाहीत, ज्यामुळे ते थोडेसे असमाधानी राहू शकतात. या आठवड्यात व्यावसायिकांना अधिक सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. जवळचे कोणीतरी तुमची फसवणूक करू शकते, म्हणून प्रत्येक व्यवहार काळजीपूर्वक तपासा
आर्थिक स्थिती (Wealth) - आर्थिक बाबतीत तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. पैशांची बचत करा. भविष्यासाठी चांगली गुंतवणूक कराल. कायदेशीर वाद होण्याची शक्यता देखील आहे, ज्यामुळे मानसिक अशांतता संभवते.
आरोग्य (Health) - या आठवड्यात, शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे म्हणजेच डिहायड्रेशनमुळे आरोग्य बिघडू शकते. विषारी घटकांचा प्रभाव वाढू शकतो, म्हणून पुरेसे पाणी प्या आणि बाहेर खाणे टाळा.
हेही वाचा :