Weekly Horoscope 16 To 22 June 2025: वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, जून महिन्याचा तिसरा आठवडा 16 ते 22 जून 2025 लवकरच सुरु होणार आहे. जून महिन्यात अनेक मोठ्या ग्रहांचं राशी परिवर्तन होणार आहे. त्यामुळे हा महिना फार खास असणार आहे. अनेक राशींसाठी महत्त्वाचा असणार आहे. नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सर्व राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

मेष रास (Aries Weekly Horoscope)

मेष राशीसाठी नवीन आठवडा जुन्या गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. करिअरच्या बाबतीत वेळ तुमच्यासाठी चढ-उतारांनी भरलेला राहणार आहे. या आठवड्यात तुम्हाला जवळच्या मित्राची साथ मिळू शकते. तुम्हाला कठोर परिश्रमाचे फळ मिळेल. तुमचे उत्पन्न वाढू शकते. तुम्ही एखाद्या खास व्यक्तीला भेटू शकता. कौटुंबिक वादांचा तुमच्यावर मोठा परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. 

वृषभ रास (Taurus Weekly Horoscope)

वृषभ राशीसाठी नवीन आठवडा सामान्य असणार आहे. आर्थिकदृष्ट्या कोणत्याही प्रकारची जोखीम घेऊ नका. यामुळे तुम्ही मोठ्या अडचणीतही येऊ शकता. या आठवड्यात मानसिक आणि शारीरिक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. या आठवड्यात तुमचे आरोग्य तुम्हाला तणावात आणू शकते. तुम्हाला संपूर्ण आठवड्यात तुमच्या वरिष्ठांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. शैक्षणिक जीवनावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. तुम्ही व्यावसायिकदृष्ट्या चांगल्या स्थितीत असाल.

मिथुन रास (Gemini Weekly Horoscope)

मिथुन राशीसाठी या आठवड्यात काही महत्त्वाच्या कामात यश मिळू शकते. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता जास्त आहे. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा आणि अनुभवी व्यक्तीच्या सल्ल्याने महत्त्वाचे निर्णय घ्या. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला काही आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. परंतु तुम्ही उर्जेने परिपूर्ण असाल.  स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला असेल. या काळात तुम्हाला प्रत्येक परीक्षेत तुमच्या मेहनतीनुसार निकाल मिळतील.

कर्क रास (Cancer Weekly Horoscope)

कर्क राशीच्या लोकांसाठी या आठवड्यात तुमचे आरोग्य बिघडू शकते. त्यामुळे आरोग्याबाबत सावधगिरी बाळगणे चांगले राहील. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ आणि सहकाऱ्यांच्या पाठिंब्यामुळे तुम्हाला महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये यश मिळेल. या आठवड्यात तुमच्या शिक्षणात काही बदल होतील. तुम्ही तुमचे ध्येय साध्य करण्यात यशस्वी व्हाल. गुंतवणुकीच्या दृष्टीने हा आठवडा खूप शुभ आहे. सध्या कोणतीही मोठी गुंतवणूक करणे टाळा. तुम्हाला मुलांचा पाठिंबा मिळेल आणि मुलांच्या बाजूने तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते. 

सिंह रास (Leo Weekly Horoscope) 

सिंह राशीसाठी या आठवड्यात, तुमच्या जोडीदाराचा पाठिंबा मिळाल्याने तुमची मानसिक चिंता कमी होऊ शकते. कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील. परंतु तुम्हाला घरातील वडीलधाऱ्यांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. जास्त कामात तुमची ऊर्जा खर्च करण्याऐवजी, फक्त महत्त्वाच्या कामांवर लक्ष केंद्रित करा. या आठवड्यात तुमचे समर्पण आणि कठोर परिश्रम फळ देतील आणि तुम्हाला काही आर्थिक लाभ मिळतील. विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला राहणार आहे. व्यावसायिक यश मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. 

कन्या रास (Virgo Weekly Horoscope)

कन्या राशीसाठी या आठवड्यात किरकोळ समस्या येऊ शकतात, परंतु तुम्ही त्यावर मात कराल. जास्त खर्च मनाला त्रास देऊ शकतो, म्हणून आर्थिक बजेट बनवा. या आठवड्यात तुम्ही तुमच्या सुखसोयींवर खर्च कराल. कोणत्याही महत्त्वाच्या निर्णयात कुटुंबाकडून पाठिंबा न मिळाल्याने मन अस्वस्थ होऊ शकते. आठवड्याच्या शेवटी नोकरीत पदोन्नती आणि कामाच्या ठिकाणी उत्पन्न वाढू शकते. व्यापाऱ्यांना नफा मिळेल..

हेही वाचा :                          

Air India Plane Crash In Ahmedabad: मोठा विमान अपघात होणार! 'तिने' आधीच भाकीत वर्तवलं होतं, महिला ज्योतिषाची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली, पोस्ट व्हायरल..

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)