Ahmedabad Air India Plane Crash : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रहांच्या संक्रमणाच्या दृष्टीने 2025 हे वर्ष फार महत्त्वाचं आहे. या वर्षात ग्रहांची अशी काही स्थिती आहे यामुळे फार नुकसान होणार आहे असे संकेत देत होते. नुकतीच अहमदाबाद एअर इंडिया विमान अपघाताची (Air India Plane Crash) दुर्दैवी घटना घडली. अशी परिस्थिती फार दशकांपूर्वी निर्माण झाली होती.
सध्या क्रूर ग्रहांची युतीसुद्धा या संकटांचा धोका अधिक वाढवतेय. ही युती 7 जून रोजी 51 दिवसांसाठी निर्माण झाली आहे. नुकत्याच अहमदाबादमध्ये एअर इंडियाचा जो विमान अपघात झाला त्यामागे ग्रहांची स्थिती नेहमी काय होती ते जाणून घेऊयात.
ग्रहांच्या 'या' स्थितीमुळे झाला अपघात
2025 या वर्षात कर्मफळदाता शनिनंतर राहू-केतू आणि गुरु ग्रहाने राशी परिवर्तन केलं. सध्या राहू कुंभ राशीत, केतू ग्रह सिंह राशीत तर गुरु ग्रह मिथुन राशीत आणि शनी मीन राशीत स्थित आहे. त्याचबरोबर, गुरु ग्रह अतिचारी आहे. गुरु ग्रहाची ही चाल भीषण अपघात, धनहानीचं कारण ठरते. धार्मिक मान्यतेनुसार, महाभारताच्या वेळीसुद्धा गुरु ग्रहाची अतिचारी स्थिती होती.
काय आहे कुंजकेतू योग?
ज्योतिष शास्त्रानुसार, 7 जून रोजी मंगळ ग्रहाने सिंह राशीत प्रवेश केला. या ठिकाणी आधीपासूनच केतू ग्रहाबरोबर युती झाल्याने 'कुंजकेतू' नावाचा योग जुळून आला होता. या युतीनंतर 51 दिवसांनी मंगळ ग्रहाच्या राशी परिवर्तनासह हा योग संपेल. ज्योतिष शास्त्रानुसार, जेव्हा दोन क्रूर ग्रहांची युती होते तेव्हा कुंजकेतू योग जुळून येतो. हा फार अशुभ योग मानला जातो. यामुळे काही राशींवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो
या संदर्भात ज्योतिष शास्त्रात एक प्रचलित काव्य आहे. ते म्हणजे, ‘शनिवत राहु व कुंजवत केतु’ अर्थात राहू शनीच्या समान आणि केतू मंगळाच्या समान फळ प्राप्त होते. ज्योतिष शास्त्रात असं म्हटलंय की, राहू आणि केतूच्या राशी आणि नक्षत्र परिवर्तनाने अनेक नकारात्मक घटना घडतात. जसे की, अग्निकांड, महामारी, अपघात, राजकीय उलथापालथ यांसारख्या घटना घडतात.
याच कारणामुळे अग्नितत्वचा ग्रह म्हटला जाणारा मंगळ ग्रह हा पराक्रम, साहस, शक्ती, ऊर्जेचा कारक ग्रह मानला जातो. तर, छाया ग्रह केतू हा मोक्ष, वैराग्य, आध्यात्माचा कारक आहे.
मंगळ आणि केतू भारताच्या सौरमंडलाच्या चौथ्या चरणात
चिंतेची बाब म्हणजे, मंगळ आणि केतू ग्रहाची युती भारतात चौथ्या चरणात झाली आहे. त्यामुळे भारतात एक नाही तर दोन-तीन अग्नितांडव या वर्षात भारतात होतील असे कुंडलीत सांगण्यात आलं आहे.
28 जुलैपर्यंत अशुभ योग
7 जूनपासून ते 28 जुलै 2025 पर्यंत मंगळ आणि केतू ग्रहाची सिंह राशीत युती होणार आहे. त्यामुळे पुढचे 45 दिवस फार अशुभ योग बनणार आहे. त्यामुळे या काळात अशा अनेक घटना, दुर्घटना घडू शकतात ज्याची आपण कधी कल्पनाच केली नसेल. अहमदाबाद एअर इंडिया विमान अपघाताची दुर्देवी घटना हे देखील याचंच उदाहरण आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :