Weekly Horoscope 15 To 21 December 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, 2025 वर्षाचा शेवटच्या महिन्याचा (December) तिसरा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. हा आठवडा फार खास असणार आहे. कारण या काळात सूर्य ग्रहसुद्धा धनु राशीत संक्रमण करणार आहे. यामुळे सूर्य ग्रहाचं संक्रमण फार प्रभावी मानलं जाईल. तसेच, तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ पाहायला मिळेल. त्यामुळे डिसेंबरचा तिसरा आठवडा (Weekly Horoscope) मेष ते मीन अशा सर्व 12 राशींसाठी नेमका कसा जाणार आहे ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Weekly Horoscope)
मेष राशीसाठी नवीन आठवडा आशावादी ठरणार आहे. सरत्या वर्षाचा महिना असल्या कारणाने अनेक नवीन गोष्टी शिकण्यास तुम्ही उत्सुक असाल. तसेच, तुमच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक नवीन बदल घडताना दिसतील. प्रत्येक कार्य करताना तुमचा दृष्टीकोन सकारात्मक राहील. तसेच, उत्पन्नातही लवकरच वाढ होण्याची शक्यता आहे.
वृषभ रास (Taurus Weekly Horoscope)
वृषभ राशीसाठी डिसेंबरचा तिसरा आठवडा आत्मनिरिक्षणाचा असणार आहे. या काळात तुम्ही जे काही कृत्य कराल ते नीट विचारपूर्वक करा. तुमच्या वागण्याने इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या. तसेच, आरोग्याच्या बाबतीत हलगर्जीपणा करु नका. नवीन गोष्टी शिकण्यास आळस दूर ठेवावा लागेल.
मिथुन रास (Gemini Weekly Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा समाधानकारक असणार आहे. मात्र, या कालावधीत तुमचं तुमच्या ध्येयावर लक्ष असायला हवं. एखाद्या नवीन उद्योगाची किंवा व्यवसायाची सुरुवात तुम्ही करु शकता. फक्त मोठे व्यवहार करताना घरातील ज्येष्ठ व्यक्तींचं मत विचारात घ्या.
कर्क रास (Cancer Weekly Horoscope)
कर्क राशीसाठी आठवड्याची सुरुवात फार चांगली असणार आहे. या कालावधीत तुम्ही ठरवलेल्या गोष्टी पटापट होतील. मात्र, आठवड्याच्या शेवटी तुम्हाला आर्थिक तंगीचा सामना करावा लागू शकतो. नवीन लोकांशी संपर्क वाढेल.
सिंह रास (Leo Weekly Horoscope)
सिंह राशीसाठी डिसेंबरचा तिसरा आठवडा महत्त्वाकांक्षी असणार आहे. या काळात घरात आनंदी वातावरण पाहायला मिळेल. तसेच, उत्पन्नाचे नवे मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. पैशांची गुंतवणूक केली असेल तर त्यात तुम्हाला लाभ मिळेल. मित्रांचं सहकार्य तुमच्यासाठी मोलाचं ठरेल.
कन्या रास (Virgo Weekly Horoscope)
कन्या राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा सतर्कतेचा असणार आहे. या कालावधीत तुम्ही कोणताही निर्णय घेताना 10 वेळा विचार करा. गरात आनंदी वातावरण असेल मात्र, तुमच्या चुकीच्या बोलण्यामुळे घरात तणाव निर्माण होऊ शकतो. यासाठी बोलण्यावर नियंत्रण ठेवा.
तूळ रास (Libra Weekly Horoscope)
तूळ राशीसाठी नवीन आठवडा सावधानतेचा असणाप आहे. या काळात कोणतीही रिस्क घेऊ नका. तसेच, ग्रहांच्या संक्रमणातचा या राशीवर नकारात्मक प्रभाव होऊ शकतो. मुलांच्या कलागुणांना चांगला वाव मिळेल. कलात्मक गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा.
वृश्चिक रास (Scorpio Weekly Horoscope)
वृश्चिक राशीसाठी नवीन आठवडा चांगला असणार आहे. या काळात तुम्हाला दूरच्या नातेवाईकांकडून शुभवार्ता मिळू शकते. तसेत, तुम्ही हाती घेतलेले कार्य निस्वार्थीपणे पार पाडाल. देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या धनसंपत्तीत भरभराट होईल.
धनु रास (Saggitarius Weekly Horoscope)
धनु राशीसाठी नवीन आठवडा प्रसन्नतेचा असणार आहे. या कालावधीत जे लोक सिंगल आहेत त्यांना चांगला जोडीदार मिळण्याची शक्यता आहे. शिक्षकांचं मुलांना चांगलं मार्गदर्शन मिळेल. तुमच्या कामकाजात तुम्ही यशस्वी व्हाल.
मकर रास (Capricorn Weekly Horoscope)
मकर राशीसाठी नवीन आठवडा शुभकारक असणार आहे. या काळात कामाच्या अनेक नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवण्यात येतील. कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागेल. काही आव्हानं समोर येतील. त्याचा तुम्ही नीट सामना कराल.
कुंभ रास (Aquarius Weekly Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांचं नवीन आटवड्यात नेटवर्क फार स्ट्रॉंग असणार आहे. या काळात तुमच्या कामाने सर्व प्रभावित होतील. बॉसकडून तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल. तसेच, नोकरीत प्रमोशन देखील मिळण्याची शक्यता आहे.
मीन रास (Pisces Weekly Horoscope)
या आठवड्यात तुम्हाला अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळतील. उत्पन्नाची नवी साधनं तुमच्यासमोपर खुली होतील. तुमच्या नात्यात अधिक घट्टपणा दिसेल. तसेच, एखाद्या नवीन कार्याची सुरुवात तुम्ही करु शकता. मित्रांच्या सहयोगाने तुम्हाला अनेक गोष्टी पूर्ण करता येतील.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)