Shatank Yog 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, कर्मफळदाता शनि (Shani Dev) सध्या मीन राशीत संक्रमण करतायत. ज्योतिष शास्त्रात शनिच्या संक्रमणाला विशेष महत्त्व आहे. कारण शनि जेव्हा राशी संक्रमण किंवा परिवर्तन करतात तेव्हा त्याचा परिणाम सर्व 12 राशींवर (Zodiac Signs) होतो. तसेच, शनि प्रत्येकाला आपल्या कर्मानुसार फळ देतात. त्यामुळेच काही राशींना शनिच्या ढैय्या आणि साडेसातीचा सामना करावा लागतो. त्यानुसार, आज म्हणजेच 13 डिसेंबर 2025 रोजी वृश्चिक राशीत शनि शुक्र ग्रहाबरोबर मिळून शतांक योग निर्माण करणार आहे.
द्रिक पंचांगानुसार, 13 डिसेंबर 2025 चा दिवस फार महत्त्वाचा असणार आहे. या कालावधीत सकाळी 6 वाजून 41 मिनिटांनी शनि शुक्र ग्रह एकमेकांच्या 100 डिग्री अंशावर असतील. यामुळे पॉवरफुल शतांक योग निर्माण होणार आहे. यामुळे अनेक राशींना चांगलाच फायदा होणार आहे. या लकी राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
सिंह रास (Leo Horoscope)
शतांक योग सिंह राशीसाठी फार लकी ठरणार आहे. या काळात कामाच्या ठिकाणी तुमची कामगिरी फार चांगली असेल. बॉसकडून तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल. तसेच, वरिष्ठ अधिकाऱ्यांचा तुमच्या कामावर विश्वास असणार आहे. आज एखादं नवीन प्रोजेक्ट तुमच्या हाती लागू शकतं. ज्या लोकांचे अनेक दिवसांपासून पैसे रखडले आहेत त्यांचे पैसे त्यांना पुन्हा मिळू शकतात. तसेच, तुमच्यातील आत्मविश्वास वाढलेला दिसेल. तुम्हाला व्यवसायात दुपटीने लाभ मिळेल.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीच्या लोकांसाठी शतांक योग फार लाभदायी ठरणार आहे. या काळात तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण पाहायला मिळेल. तसेच, या कालावधीत जर तुम्हाला नवीन वस्तूंची खरेदी करायची असेल तर त्यासाठी आजचा दिवस फार शुभ असणार आहे. तुमच्या प्रत्येक कार्यात देवी लक्ष्मीचा वास असणार आहे. त्यामुळे तुम्हाला यशच मिळेल.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार शुभकारक असणार आहे.आज तुमचे व्यवहार प्रामाणिक असतील. लवकरच धनसंपत्तीत भरभराट दिसून येईल. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना चांगला वाव मिळेल. तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा दिसून येईल. तसेच, कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. हा प्रवास तुमचा सुखकर राहील.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)