Weekly Horoscope 12 To 18 May 2025 : मे महिन्याचा दुसरा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. या आठवड्यात  अनेक मोठ्या ग्रहांचं संक्रमण देखील आहे. त्यामुळे हा आठवडा अनेक राशींसाठी महत्त्वाचा असणार आहे. नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सर्व राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

तूळ रास (Libra Weekly Horoscope)

तूळ राशीसाठी मे महिन्याचा दुसरा आठवडा लाभदायक ठरणार आहे. या काळात तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली असेल. तसेच, तुमच्या करिअरमध्ये प्रगतीच्या अनेक संधी निर्माण होतील. या आठवड्यात कोणत्याच गोष्टीसाठी धावपळ करु नका. 

वृश्चिक रास (Scorpio Weekly Horoscope)

वृश्चिक राशीसाठी नवीन आठवडा शुभ असणार आहे. या आठवड्यात तुम्ही भावनिकरित्या इतरांशी कनेक्ट होऊ शकता. तसेच, सोशल एक्टिव्हिटीजवर देखील भर देणं गरजेचं आहे. कामाच्या ठिकाणी तुमची लीडरशिप क्वालिटी दिसून येईल. बॉसकडून कामाचं कौतुक केलं जाईल. 

धनु रास (Sagittarius Weekly Horoscope)

धनु राशीसाठी नवीन आठवडा चढ-उतारांचा असणार आहे. या दरम्यान कोणत्याच रिस्क घेऊ नका. तुमचे निर्णय फसू शकतात. तसेच, जर पैशांची गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला घेणं गरजेचं आहे. नियमित योग आणि ध्यान करणं गरजेचं आहे. 

मकर रास (Capricorn Weekly Horoscope)

मकर राशीसाठी आजचा दिवस प्रगतीचा असणार आहे. तुम्ही तुमच्या आरोग्यावर लक्ष देणं गरजेचं आहे. तसेच, तुम्ही धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकता. भौतिक सुख-सुविधांचा तुम्हाला चांगला लाभ घेता येईल. आटवड्याच्या शेवटी तुमच्या खर्चात वाढ होऊ शकते. त्यामुळे वेळीच खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. 

कुंभ रास (Aquarius Weekly Horoscope)

कुंभ राशीसाठी नवीन आठवडा लाभदायक असणार आहे. या काळात तुमचे ऑनलाईन खर्च वाढू शकतात. तसेच, कुटुंबात तुमची आर्थिक मदत भासू शकते. घरातील वातावरण चांगलं असेल. मात्र, तुमच्या सुखासाठी इतरांवर अवलंबून राहू नका. उत्पन्नाचे नवे मार्ग तुमच्यासमोर खुले होऊ शकतात. 

मीन रास (Pisces Weekly Horoscope)

मीन राशीसाठी नवीन आठवडा समाधानकारक असणार आहे. तुमच्या भौतिक सुख-सुविधांमधून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. तसेच, कामकाजात तुमची प्रगती दिसून येईल. आठवड्याच्या शेवटी तुमच्या घरात पाहुण्यांचं आगमन होऊ शकतं. तसेच, आरोग्याच्या बाबतीत तुम्ही सतर्क असणं गरजेचं आहे. निष्काळजीपणा करु नका. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :

Weekly Horoscope : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशींसाठी मे महिन्याचा नवीन आठवडा कसा असणार? साप्ताहिक राशीभविष्य