Mumbai News : मुंबईतील चाकरमान्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. यात ठाणे ते नवी मुंबई ट्रान्स हार्बर मार्गावरील रेल्वे (Railway) गेल्या दोन तासापासून बंद असल्याची माहिती समोर आली आहे. ठाणे ते ऐरोली दरम्यान एमएमआडीए विभागाच्या रोरो ब्रीजच काम सुरु असल्याने ही वाहतूक बंद असल्याची माहिती समोर आली आहे. तर मध्य रेल्वेची अपलाईन ही अर्धा तास उशिराने धावत आहे. परिणामी याचा फटका प्रवाशांना बसतांना दिसून येत आहे.
पुढे आलेल्या माहितीनुसार, ठाणे ते ऐरोली दरम्यान एमएमआडीए विभागाच्या रोरो ब्रीजच काम सुरु असल्याने ही वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. परिणामी ठाणे स्टेशनला आणि रेल्वे रुळावर रेल्वे प्रवाशांची मोठी गर्दी दिसून येत आहे. मात्र कोणत्याही प्रकारची अनाउन्समेंट होत नसल्यामुळे रेल्वे प्रवासी संतप्त झाले आहे. तर सकाळी कामावरती जाणाऱ्या नोकरदार वर्गांना याचा फटका बसला आहे.
रेल्वे सेवेवर परिणाम
दरम्यान, ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या (India Vs Pakistan) परिस्थितीमुळे रेल्वे कर्मचाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रेल्वे बोर्डाने सर्व कर्मचाऱ्यांना अलर्ट केले आहे की, पाकिस्तानी गुप्तचर संस्था भारतीय लष्करी गाड्यांबद्दल माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करू शकतात. यासोबतच, ब्लॅकआउट-आणीबाणीच्या परिस्थिती लक्षात घेता भारतीय रेल्वेने अनेक गाड्या रद्द केल्या आहेत. तर काही गाड्यांचे वेळापत्रकही बदलण्यात आले आहे.
याशिवाय ब्लॅकआउट आणि आपत्कालीन परिस्थितीमुळे काही रेल्वे सेवांवर परिणाम होईल अशी माहिती उत्तर पश्चिम रेल्वेने दिली आहे. या परिस्थितीमुळे अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. परंतु काही गाड्यांच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आला आहे. जर तुम्ही 9 मे 2025 रोजी सहलीचे नियोजन करत असाल तर काळजीपूर्वक विचार करा. उत्तर पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शशी किरण म्हणाले की, सुरक्षेच्या कारणास्तव रेल्वेच्या कामकाजात बदल करण्यात आले आहेत. ब्लॅकआउट परिस्थिती आणि आपत्कालीन व्यवस्थेमुळे रेल्वेला काही गाड्या तात्पुरत्या स्वरूपात रद्द कराव्या लागल्या आहेत आणि काही गाड्यांचे वेळापत्रक बदलावे लागले आहे.
या ट्रेन आज धावणार नाहीत
- ट्रेन क्रमांक 14895 - भगत की कोठी ते बाडमेर रद्द
- ट्रेन क्रमांक 14896 - बारमेर ते भगत की कोठी रद्द
- ट्रेन क्रमांक 04880 - मुनाबाव ते बाडमेर रद्द
- ट्रेन क्रमांक 54881 - बाडमेर ते मुनाबाओ रद्द
या ट्रेन उशिराने धावतील
- ट्रेन क्रमांक 14807 - जोधपूर ते दादर एक्सप्रेस 9 मे रोजी जोधपूर येथून 05:10 ऐवजी 08:10 वाजता (3 तास उशिराने) निघेल.
- ट्रेन क्रमांक 14864 - जोधपूर ते वाराणसी सिटी एक्सप्रेस 9 मे रोजी जोधपूर येथून 08:25 ऐवजी 11:25 वाजता (3 तास उशिराने) निघेल.
हे ही वाचा