Weekly Horoscope 12 To 18 May 2025 : मे महिन्याचा दुसरा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. या आठवड्यात  अनेक मोठ्या ग्रहांचं संक्रमण देखील आहे. त्यामुळे हा आठवडा अनेक राशींसाठी महत्त्वाचा असणार आहे. नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सर्व राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

मेष रास (Aries Weekly Horoscope)

मेष राशीच्या लोकांसाठी मे महिन्याचा दुसरा आठवडा चांगला असणार आहे. या दरम्यान तुमचा आत्मविश्वास जास्त असेल. कोणीही तुमचा गैरफायदा घेऊ शकणार नाही. तसेच, या काळात तुमच्या कुटुंबियांतील सदस्यांची विशेष काळजी घ्या. तसेच, नोकरीत प्रमोशन मिळू शकतं. तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळेल. कुटुंबात सुख-शांती टिकून राहील. 

वृषभ रास (Taurus WeeklY Horoscope)

वृषभ राशीसाठी नवीन आठवडा शुभकारक असणार आहे. या काळात तुमच्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफमध्ये अनेक बदल दिसून येतील. तुमचं मन धार्मिक कार्यात रमेल. तसेच, एखाद्या नवीन कार्याची सुरुवात करायची असल्यास हा आठवडा तुमच्यासाठी लाभदायक असणार आहे. तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. 

मिथुन रास (Gemini Weekly Horoscope)

मिथुन राशीसाठी नवीन आठवडा काहीसा चढ-उतारांचा असणार आहे. या आठवड्यात मिथुन राशीत ग्रहांचं संक्रमण देखील होणार आहे. त्यामुळे हा काळ तुमच्यासाठी आव्हानात्मक ठरु शकतो. यासाठी तुम्ही कोणत्याही गोष्टीचा जास्त विचार करु नका. धार्मिक गोष्टीत तुमचं मन गुंतवा. तसेच, शारीरिक स्वास्थ्याची काळजी घ्या. 

कर्क रास (Cancer Weekly Horoscope)

कर्क राशीच्या लोकांना नवीन आठवड्यात भाग्याची साथ मिळणार आहे. या काळात तुम्ही तुमच्या डाएटवर भर देणं गरजेचं आहे. तसेच, तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. कामात तुमचं मन रमेल. तसेच, नवीन कामाच्या ऑर्डर्स तुम्हाला मिळतील. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली असेल. 

सिंह रास (Leo Weekly Horoscope) 

सिंह राशीसाठी नवीन आठवडा चांगला असणार आहे. या काळात तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील. तसेच, कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळेल. उत्पन्नाचे नवे मार्ग तुमच्यासमोर खुले होतील. या काळात शेअर मार्केटमध्ये तुम्ही पेशांची गुंतवणूक करु शकता. आरोग्याची काळजी घ्या. 

कन्या रास (Virgo Weekly Horoscope)

कन्या राशीसाठी नवीन आठवडा लाभदायक असणार आहे. या कालावधीत समाजात तुम्हाला चांगला मान-सन्मान मिळेल. तसेच, तुम्ही काही मोठे निर्णय घेण्याची शक्यता आहे. तुम्हाला भौतिक सुख-सुविधांचा चांगला लाभ घेता येईल. उत्पन्नाचे नवे मार्ग तुमच्यासमोर खुले होतील. कुटुंबात सुख-शांती लाभेल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :

Weekly Horoscope : मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी मे महिन्याचा दुसरा आठवडा नेमका कसा असणार? वाचा लकी कलर, नंबर आणि टीप ऑफ द वीक