Weekly Horoscope 10 To 16 April 2023 : हा आठवडा कर्क, कन्या, तूळ आणि धनु राशीच्या लोकांसाठी नोकरीच्या नवीन संधी घेऊन येईल. आजपासून सुरू झालेला आठवडा ज्योतिषाच्या दृष्टीने खास आहे. या आठवड्यात ग्रहांच्या हालचालीत बदल आहेत. यासाठी सर्व 12 राशींचे राशीभविष्य जाणून घेऊयात.
मेष
आठवड्याच्या सुरुवातीलाच काही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. त्यामुळे कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. ज्या कामाची तुम्ही जबाबदारी घ्याल ते काम तुम्ही चांगल्या पद्धतीने पार पाडू शकाल. कार्यालयात वरिष्ठ आणि कनिष्ठ दोघांचेही पूर्ण सहकार्य असेल. या आठवड्यात पैसे जपून वापरा. या काळात हंगामी आजारांपासून दूर राहा. वैवाहिक जीवन आनंदी राहील. कुटुंबासोबत आनंदाने वेळ घालवण्याची संधी मिळेल.
वृषभ
आठवड्याची सुरुवात चांगली असेल. व्यवसायाशी संबंधित कोणतीही शुभ बातमी येईल. आर्थिक बाजू मजबूत राहील. जर तुम्ही बर्याच दिवसांपासून नोकरी बदलण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला एखाद्या चांगल्या ठिकाणाहून ऑफर मिळण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी तसेच घरामध्ये नोकरदार महिलांचा सन्मान वाढेल. सत्ता-शासनाशी संबंधित प्रलंबित कामे पूर्ण होतील. कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवण्याची संधी मिळेल.
मिथुन
आठवड्याच्या सुरुवातीला काही अतिरिक्त कामामुळे व्यस्त राहाल. तुमच्यावर कामाच्या जबाबदाऱ्यांचा भार पडेल, त्यामुळे तुम्हाला मानसिक ताण येऊ शकतो. अशा परिस्थितीत कोणतेही काम हाताळताना संयम राखणे योग्य राहील. आठवड्याच्या मध्यात, आपल्या बोलण्यावर आणि वागण्यावर नियंत्रण ठेवा. कोणत्याही परिस्थितीत आपला संयम गमावू नका, नाहीतर चालू असलेले काम बिघडू शकते. ऑफिसमधील अशा लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करा जे अनेकदा तुमच्या ध्येयापासून तुमचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करतात. आठवड्याचा मध्य व्यापार्यांसाठी अधिक शुभ आणि लाभ देणारा आहे. या काळात तुम्हाला व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल.
कर्क
आठवड्याच्या सुरुवातीला कामात काही अडचणींना सामोरे जावे लागेल. तुम्हाला तुमच्या शरीराची खूप काळजी घ्यावी लागेल. हंगामी आजारामुळे किंवा काही दिर्घ काळापासून असलेल्या आजारामुळे तुम्हाला शारीरिक वेदना होऊ शकतात. वाहन जपून चालवा, इजा होण्याची शक्यता आहे. व्यावसायिकाने व्यवसायाशी संबंधित कोणताही मोठा निर्णय काळजीपूर्वक घ्यावा. आठवड्याच्या मध्यात आर्थिक स्थिती मध्यम राहील. प्रेमसंबंधात गैरसमज निर्माण होऊ शकतात, ते दूर करण्यासाठी वाद करू नका तर संवादाने प्रश्न सोडवा.
सिंह
आठवड्याची सुरुवात खूप शुभ असणार आहे. जे लोक खूप दिवसांपासून काही मोठ्या प्रकल्पात सहभागी होण्याची वाट पाहत आहेत, त्यांच्या इच्छा पूर्ण होतील. एखाद्या प्रभावी व्यक्तीच्या मदतीने दीर्घकाळ रखडलेले काम पूर्ण होईल, त्यामुळे तुम्हाला मोठा दिलासा मिळेल. ऑफिसमध्ये तुमच्या कामाचे कौतुक होईल. वरिष्ठ तुमच्यावर काही मोठी जबाबदारी सोपवू शकतात. व्यवसायाला पुढे नेण्याचे नियोजन प्रत्यक्षात साकार होताना दिसतील. जर तुम्हाला काही काळ आरोग्याशी संबंधित कोणत्याही समस्येचा सामना करावा लागत असेल तर त्यात लक्षणीय सुधारणा होईल.
कन्या
आठवड्याची सुरुवात जीवनाशी संबंधित सर्व अडथळे दूर करण्यात जाईल. न्यायालयाशी संबंधित प्रकरणांमध्ये, निर्णय तुमच्या बाजूने येऊ शकतो. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. कोणताही मोठा निर्णय घेताना कुटुंबीयांचे पूर्ण सहकार्य मिळेल. जर तुम्ही खूप दिवसांपासून नवीन काम सुरू करण्याचा विचार करत असाल तर तुमची ही इच्छा पूर्ण होऊ शकते. कामासोबतच आरोग्याचीही काळजी घ्यावी लागेल. जेवणाची विशेष काळजी घ्या. जर तुम्ही खूप दिवसांपासून एखाद्यासमोर तुमचे प्रेम व्यक्त करण्याचा विचार करत असाल तर आठवड्याच्या मध्यात तुमच्या भावना व्यक्त करा.
तूळ
आठवड्याचा शेवट संमिश्र असेल. आरोग्याशी संबंधित कोणत्याही समस्येमुळे तुमच्या कामावर परिणाम होऊ शकतो. या दरम्यान हंगामी आजारांपासून सावध रहा. यासोबतच या काळात खाण्यापिण्याची खूप काळजी घ्या. तुमच्या समस्यांकडे पाठ फिरवण्याऐवजी तुम्ही त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करा. प्रेम संबंध चांगले ठेवण्यासाठी घाई टाळा आणि विचारपूर्वक पुढे जा. तुमचा जोडीदार कठीण काळात तुमच्या पाठीशी असेल.
वृश्चिक
आठवड्याच्या शेवटी तुम्हाला तुमच्या विरोधकांशी खूप सावधगिरी बाळगावी लागेल. अशा लोकांशी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे जे वारंवार तुमचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करतात. घाई करण्याऐवजी कोणतेही काम हुशारीने करण्याचा प्रयत्न करा, नाहीतर तुम्हाला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते. हंगामी किंवा कोणत्याही दिर्घकालीन आजाराच्या उद्रेकामुळे शरीर आणि मन दुखू शकते. या दरम्यान तुमची जीवनशैली योग्य ठेवा आणि खाण्याकडे विशेष लक्ष द्या. कोणत्याही परिस्थितीत आपल्या वरिष्ठ आणि कनिष्ठांशी संबंध बिघडू देऊ नका.
धनु
आठवड्याच्या सुरुवातीला जीवनाशी निगडीत अडचणी सुकर होताना दिसतील. मित्राच्या मदतीने दीर्घकाळ रखडलेली कामे पूर्ण होतील. मुलांशी संबंधित कोणतीही चांगली बातमी मिळेल. आठवड्याच्या मध्यात तुम्हाला व्यवसायाच्या संदर्भात लांब अंतराचा प्रवास करावा लागेल. नातेसंबंध विस्ताराच्या दृष्टीने प्रवास सुखकर आणि शुभ राहील. या काळात तुम्हाला घराच्या सजावटीसाठी किंवा दुरुस्तीसाठी तुमच्या खिशातून जास्त पैसे खर्च करावे लागतील, ज्यामुळे तुमचे बजेट बिघडू शकते.
मकर
मकर राशीच्या लोकांना आठवड्याच्या सुरुवातीला चांगल्या उत्पन्नाचा फायदा होईल. तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील. यामुळे तुमचा आत्मविश्वासही वाढेल. वैवाहिक जीवनात सुख राहील. आठवड्याच्या मध्यात तुमच्या खर्चात वाढ होऊ शकते. ज्या लोकांना राजकारणात करिअर करायचे आहे. त्यांच्यासाठी हा काळ चांगला आहे.
कुंभ
कुंभ राशीचे लोक आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित करतील. नोकरीत खूप मेहनत घेत असल्यामुळे तुम्हाला थोडा त्रास होईल पण नंतर तुम्हाला याचाच फायदा होईल. कुटुंबातील सदस्यांचा पाठिंबा तुम्हाला मिळेल. व्यवसायासाठीही हा आठवडा चांगला आहे. सप्ताहाच्या मध्यात प्रेम जीवनासाठी वेळ चांगला असेल. तुमच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत काही खर्चात वाढ होईल. तब्येत बिघडू शकते. विरोधक तुम्हाला त्रास देऊ शकतात, सावध राहा.
मीन
मीन राशीच्या लोकांना आठवड्याच्या सुरुवातीला नशिबाची साथ मिळेल आणि तुमची अनेक कामे पूर्ण होतील. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. कामात यश मिळेल. लांबच्या प्रवासाची शक्यता आहे. आठवड्याच्या मध्यात करिअरवर लक्ष केंद्रित करण्यासाठी वेळ मिळेल. चुका टाळा आणि तुमच्या कामावर पूर्ण लक्ष केंद्रित करा. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत उत्पन्न चांगले राहील. प्रेम जीवनासाठी वेळ चांगला आहे. तुमचा आत्मविश्वास वाढेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या :