Wednesday Lord Ganesh : भगवान गणपतीला विघ्नहर्ता म्हणून ओळखले जाते कारण त्यांची पूजा केल्याने सर्व संकटे दूर होतात. गौरीपुत्र गणेशाला सर्व देवतांमध्ये प्रथम पूज्य होण्याचे वरदान आहे. त्यामुळे कोणतीही पूजा सुरू करण्यापूर्वी गणेशाची पूजा केली जाते. सर्व दु:खांपासून मुक्ती मिळवण्यासाठी बुधवारी नियमानुसार गजाननाची पूजा केल्यास इच्छित फळ मिळते. बुधवारी गणपतीची पूजा केल्याने कामातील अडथळे दूर होतात. बुधवार हा गणपतीला समर्पित आहे. या दिवशी संपूर्ण विधीपूर्वक गणपतीची पूजा केली जाते. 



बुधवारी हा उपाय करा


तुमच्या कामात वारंवार अडथळे येत असतील किंवा केलेले काम बिघडत असेल तर श्रीगणेशाची पूजा करताना त्यांच्या कपाळी सिंदूराचा टिळा लावावा. सिंदूर टिळा लावल्याने गणेशजी प्रसन्न होतात. लोकांना अपेक्षित परिणाम मिळतात. धार्मिक शास्त्रानुसार, बुधवारी गणेशाची पूजा केल्याने मन शांत होते आणि आत्मविश्वास वाढतो.



जीवनातील सर्व संकटे दूर होतात
ज्योतिषशास्त्रातील या उपायाने सर्व वाईट गोष्टी दूर होऊ लागतात. जीवनात येणाऱ्या समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी बुधवारी गाईला गवत खाऊ घालावे. असे म्हटले जाते की, वर्षातून एकदा तरी बुधवारी आपल्या वजनाएवढे गवत खरेदी करून गोठ्यात दान करावे. यामुळे जीवनातील सर्व संकटे दूर होतात.



बुधवारी अशा प्रकारे गणेशाची पूजा करा


ज्योतिषशास्त्रानुसार सकाळी लवकर उठा, आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला. पूजास्थानावर पाणी शिंपडून ते स्वच्छ करा आणि लाल रंगाचे कापड पसरवा. आता अक्षत ठेवून त्यावर गणेशाची मूर्ती बसवा. गणपतीला गंगेच्या पाण्याने अभिषेक करावा. यानंतर देवाला दुर्वा, अक्षता, फुले, हार आणि टिळा अर्पण करा. गणेशाच्या मूर्तीजवळ धूप-दिवे लावा आणि त्याच्या आवडीचे मोदक किंवा लाडू अर्पण करा. गणपतीच्या पूजेमध्ये गणेशाच्या मंत्रांचा जप केल्याने विशेष लाभ होतो. शेवटी आरतीनंतर प्रसाद वाटप करावा.


 


आठवड्यातील प्रत्येक दिवस विविध देव किंवा देवीला समर्पित


हिंदू धर्मात प्रत्येक दिवसाचे काही ना काही महत्त्व आहे. तसेच, आठवड्यातील प्रत्येक दिवस नक्कीच विविध देव किंवा देवीला समर्पित असतो. तसेच बुधवारी गणपतीची पूजा करण्याचा नियम आहे. हिंदू धर्मात गणेशाला विघ्नांचा नाश करणारा आणि हितकारक मानला जातो. असे मानले जाते की, जर बुधवारी पूर्ण भक्तीभावाने गणेशाची पूजा केली तर त्याच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात. त्यामुळे या दिवशी गणेशाची पूजा अवश्य करावी. याशिवाय या दिवसासाठी जे नियम निश्चित केले आहेत तेही पाळावेत. 


 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


इतर बातम्या


Budhwar Upay : बुधवारी चुकूनही 'हे' काम करू नका, अन्यथा होईल धनहानी