Wednesday Budhdev Upay : बुधाला ग्रहांचा मुकुटमणी म्हणतात. हा ग्रह अत्यंत बुद्धिमान आणि सौम्य मानला जातो. बुधवार हा बुद्धदेवांना समर्पित आठवड्याचा दिवस आहे. बुध ग्रहाचा व्यक्तीच्या बुद्धीवर, वाणीवर प्रभाव पडतो असे म्हणतात. ज्यांच्या कुंडलीत बुध मजबूत स्थितीत असतो, ते लोक खूप हुशार, तर्कशक्‍तीत कुशल असतात. परंतु कुंडलीत बुध ग्रहाच्या कमकुवतपणामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. कमकुवत बुध, व्यक्तीला भाषण किंवा त्वचेची समस्या देखील असू शकते. बुधाला प्रसन्न करण्याचे उपाय जाणून घेऊया


बुद्धदेवांना प्रसन्न करण्याचे उपाय


-हिरवा रंग आणि तृतीयपंथीय हे दोन्ही बुध ग्रहाशी संबंधित आहेत. बुधवारी तृतीयपंथीयाना हिरवे वस्त्र दान केल्याने बुध ग्रहाचा शुभ प्रभाव वाढतो.
-या दिवशी गरीब किंवा गरजूंना मूग दान केल्याने सर्व दु:ख दूर होतात. अनेक संकटांचे निवारण होते. कांसाचे दान करणे देखील शुभ असते.
-ज्यांच्या कुंडलीत बुध ग्रह दोष आहे त्यांनी विशेषतः बुधवारी गणपतीला मोदक अर्पण करावेत. यामुळे ग्रहाचे दोष दूर होतील.
-बुध दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी सोन्याचे दागिने घालणे फायदेशीर मानले जाते.


-याशिवाय बुध ग्रहाचा अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी घराच्या पूर्व दिशेला लाल ध्वज लावावा.
-कुंडलीत बुध ग्रहाची शुभता प्राप्त करण्यासाठी बुध ग्रहाच्या बीज मंत्राचा 14 वेळा जप करावा.


ॐ ब्रां ब्रीं ब्रौं स: बुधाय् नम:।।


या दिवशी उत्तर, पश्चिम आणि ईशान्येकडे प्रवास करू नका. तसेच पैशाचे व्यवहार करणे टाळा. नवीन शूज, कपडे खरेदी करू नका. बुध हा वाणीचा कारक मानला जातो, त्यामुळे कुंडलीत कमजोर असल्यास वाणीवर संयम ठेवा आणि गोडवा आणा. महिलांनी बुधवारी हिरव्या बांगड्या घालाव्यात आणि वेलची खावी.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 


हेही वाचा :