Vivah Muhurta 2023 : हिंदू धर्मात (Hindu Religion) कोणतेही कार्य किंवा शुभ कार्य करण्यापूर्वी शुभ मुहूर्त निश्चितपणे पाहिला जातो. लग्नासारख्या (Vivah Muhurta) गोष्टींसाठी शुभ किंवा अशुभ काळ खूप महत्त्वाचा असतो. हिंदू रितीरिवाजानुसार मंगल मुहूर्तावर कार्य केल्याने वैवाहिक जीवन चांगले जाते. 2023 मध्ये अनेक शुभ मुहूर्त आहेत. हिंदू कॅलेंडरनुसार, वर्षातील काही शुभ मुहूर्त आहेत, ज्या दिवशी लग्न करणे खूप शुभ मानले जाते


2023 मध्ये लग्नासाठी 64 शुभ मुहूर्त


हिंदू कॅलेंडरनुसार 2023 मध्ये लग्नासाठी फक्त 64 शुभ मुहूर्त आहेत. त्यापैकी जानेवारीमध्ये 9, फेब्रुवारीमध्ये 13, मार्चमध्ये 6, मेमध्ये 13, जूनमध्ये 11, नोव्हेंबरमध्ये 5 आणि डिसेंबरमध्ये 7 विवाह शुभ मुहूर्त ठरत आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार वर्षात असे चार दिवस आहेत. त्या दिवशी मुहूर्त न पाहाताही लग्न किंवा धार्मिक विधी करता येतो. यात अक्षय्य तृतीया, देवउठनी एकादशी, वसंत पंचमी आणि आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील भडली नवमी यांचा समावेश आहे. दुसरीकडे विवाहासारख्या शुभ कार्यासाठी शुक्र ग्रह उदय स्थितीत असणं आवश्यक आहे. 2023 मध्ये तुमचे लग्न कधी होणार? हे जाणून घ्या.



2023 मध्ये लग्नासाठी शुभ मुहूर्त


जानेवारी 2023 - 15, 16, 18, 19, 25, 26, 27, 30, 31


फेब्रुवारी 2023 - 6, 7, 8, 9 10, 12, 13, 14, 15, 17, 22 23, 28


मार्च 2023- 1, 5,6, 9,11, 13


मे 2023 - 6, 8, 9, 10, 11, 15, 16, 20, 21, 22, 27, 29, 30


जून 2023 - 1, 3, 5, 6, 7, 11, 12, 23, 24, 26, 27


नोव्हेंबर 2023 - 23, 24, 27, 28, 29


डिसेंबर 2023 - 5, 6, 7 8, 9, 11, 15


2023 मध्ये 'या' महिन्यांत लग्न होणार नाही


एप्रिलमध्ये धनु महिन्यामुळे कोणतेही शुभ कार्य होणार नाही. यासह जून महिन्यापासून चातुर्मास सुरू होईल, त्यानंतर कोणतेही लग्न वगैरे शुभ कार्य 4 महिन्यांनंतरच सुरू होतील


एप्रिल 2023 - या महिन्यात गुरु तारा मावळत आहे. त्यामुळे या संपूर्ण महिन्यात 5 मे पर्यंत फारसे लग्न होणार नाहीत.


जुलै 2023 - जुलै महिन्यात चातुर्मास सुरू होत आहे. या महिन्यापासून भगवान विष्णू पुढील चार महिने योग निद्रामध्ये जातील.


ऑगस्ट 2023- या महिन्यात चातुर्मास सोबतच शुक्र नक्षत्र अस्त करेल.


सप्टेंबर 2023 - या महिन्यात चातुर्मासासह सौर महिना प्रतिबंधित आहे. त्यामुळे शुभ कार्ये वर्ज्य आहेत.


ऑक्टोबर 2023 - या महिन्यात वर्ज्य सौर महिना देखील आहे.


नोव्हेंबर 2023- 22 नोव्हेंबरपर्यंत चातुर्मासामुळे मंगल कार्य सुरुवातीला होणार नाहीत.


 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


संबंधित बातम्या


Chanakya Niti : असे कर्मचारी ऑफिसमध्ये सगळ्यांना प्रिय असतात, कोणतीही समस्या क्षणार्धात सोडवतात, चाणक्य म्हणतात..