Vipreet Rajyog 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, देवतांचा गुरु असलेला ग्रह म्हणजेच गुरु ग्रह यंदा अतिचारी चाल चालणार आहे. यासाठी एका वर्षातून दोनदा हा ग्रह राशी परिवर्तन करणार आहे. यामुळे कोणत्या ना कोणत्या ग्रहाबरोबर संयोग जुळून अनेक शुभ-अशुभ राजयोग निर्माण होणार आहे. त्यानुसार, यंदा म्हणजेच 18 ऑक्टोबर 2025 म्हणजेच आजपासून  5 डिसेंबर 2025 पर्यंत कर्क राशीत असणार आहे. त्यानंतर, 2 जून 2026 ते 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत त्यानंतर 25 जानेवारी 2027 ते 26 जून 2027 रोजी गुरु ग्रह पुन्हा कर्क राशीत प्रवेश करणार आहे. 

Continues below advertisement


ज्योतिष शास्त्रानुसार, गुरु ग्रहाच्या स्थितीत होणारा बदल सर्व 12 राशींवर पाहायला मिळणार आहे. तर, गुरुच्या राशीत मीनमध्ये वक्री अवस्थेत शनि विराजमान आहे. अशातच गुरु शनिबरोबर संयोग करुन विपरीत राजयोग निर्माण होणार आहे. शनि-गुरुचा विपरीत राजयोग निर्माण झाल्याने काही राशींना चांगला लाभ मिळणार आहे. या लकी राशी कोणत्या ते जाणून घेऊयात. 


सिंह रास (Leo Horoscope)


सिंह राशीच्या कुंडलीत शनि सहाव्या आणि सातव्या स्थानाचा स्वामी होऊन आठव्या चरणात विराजमान आहे. तर, गुरु ग्रह या राशीच्या बाराव्या चरणात संक्रमण असणार आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांवर शनिच्या साडेसातीपर्यंत आराम मिळू शकतो. कारण बृहस्पतीची दृष्टी आठव्या चरणावर पडतेय. या काळात तुमचं धार्मिक कार्यात मन रमेल. तसेच, प्रवासाला जाण्याचे योग जुळून येणार आहेत. तुम्हाला वाहनसुख मिळेल. 


धनु रास (Saggitarius Horoscope)


गुरु-शनिचा विपरीत राजयोग फार लकी ठरणार आहे. या राशीच्या सहाव्या स्थानी शनि वक्री अवस्थेत असणार आहे. त्यामुळे या काळात तुम्ही जे काही कार्य हाती घ्याल त्यात तुम्हाला चांगलं यश मिळेल. तसेच, समाजात तुम्हाला चांगला मान-सन्मान मिळेल. तुमच्या करिअरला नवीन दिशा मिळेल. नोकरदार वर्गातील लोकांना या काळात चांगला लाभ मिळेल. तसेच, तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण पाहायला मिळेल. 


तूळ रास (Libra Horoscope)


तूळ राशीसाठी हा काळ भाग्याचा असणार आहे. या राशीच्या शनि वक्री अवस्थेत असणार आहे. या काळात तुम्हाला अनेक क्षेत्रात चांगला लाभ मिळेल. करिअरमध्ये तुमची चांगली प्रगती दिसून येईल. तसेच, समाजात तुम्हाला चांगला मान-सन्मान मिळेल. या काळात तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल. तसेच, व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  


हेही वाचा :


Dhanteras 2025 : धनत्रयोदशीला जुळून आला शनि त्रयोदशीचा शुभ संयोग; 'या' 5 राशींवर आलेलं संकट टळेल, शनि करणार पापातून मुक्ती