नवी दिल्ली :देशभरातदिवाळीसणाचीधामधूमसुरुआहे. बाजारपेठाग्राहकांनीतुडुंबभरल्याअसूनसर्वत्रमोठ्याउत्साहाचेवातावरणआहे. अशातच दीपावलीच्या निमित्ताने पणती, सजावटीचे सामानसहइतरवस्तू विकण्यासाठी रस्त्यावर व्यवसाय करतात. अशा फेरीवाल्यांना प्रशासनाच्या कठोर कारवाईचा सामना करावा लागतो. याविषयी दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवर मानवाधिकार आयोगाचे (National Human Rights Commission) सदस्य प्रियांक कानूनगो यांनी सुनावणी घेऊन महाराष्ट्रासह 38 मुख्य सचिवांना नोटीस (National Human Rights Commission issues Notice) जारी केली आहे. त्यामुळे ऐन दिवाळसणात प्रशासनाकडून गरीब फेरीवाल्यांना देण्यातयेणारा त्रासाबद्दलमहत्वपूर्णनिर्णयघेण्यातआलाआहे.

National Human Rights Commission Issues Notice: मानवाधिकार कायदा कलम 12 अंतर्गत आयोगाकडून दखल 

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची महाराष्ट्रासह 38 मुख्य सचिवांना नोटीस बजावण्यातआलीआहे. यात अग्निशमन प्रतिबंधनाच्या नावाखाली छळवणूक नको, अग्निशमनासाठी प्रतिबंध करणे हि प्रशासनाची जबाबदारी असल्याचेम्हटलंआहे. स्थानिक प्रशासन व्यापाऱ्यांशी संगनमत करून छोट्या फेरीवाल्यांचा छळ करत असल्याचा आरोप देखीलयातूनकरण्यातआलाआहे. मानवाधिकार कायदा कलम 12 अंतर्गत आयोगाकडून हि दखल घेण्यातआलीआहे. दिपावलीत दंड / जबरदस्ती माल उचल नको असे मानवाधिकार आयोगचेम्हणणेआहे. परिणामीयावर मुख्य सचिवांना कृती अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यातआलेआहे.

Diwali 2025: दिवाळीसाठी बाजारपेठेत एक मराठा लाख मराठाच्या आकाश कंदीलाच विशेष आकर्षण

दिवाळीचा सण फटाके आणि आकाश कंदील शिवाय पूर्णच होऊ शकत नाही. हिंगोलीच्या बाजारपेठे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आकाश कंदील विक्रीसाठी दाखल झाले आहेत. रंगीबेरंगी लहान मोठ्या आकाराचे वेगवेगळ्या नक्षीचे आकाश कंदील हिंगोलीच्या बाजार विक्रीसाठी दाखल झाले आहेत आणि हेच आकाशकंदील खरेदी करण्यासाठी आता हिंगोली कर गर्दी करू लागले आहेत.  आकाश कंदीलाचे भाव गत वर्षीच्या तुलनेत स्थिर असून एक मराठा लाख मराठा च्या आकाश कंदीलाची विशेष मागणी पाहायला मिळत आहेत दिवाळी हा सण दिव्यांचा उजेडाचा सण असतो त्यामुळे आकाश कंदीलाच या सणामध्ये खूप मोठे महत्त्व असतं दरम्यान या रंगीबिरंगी आकाश कंदीलाने हिंगोलीची बाजारपेठ उजळून निघाली आहे.

महत्वाच्या बातम्या: