Dhanteras 2025 : हिंदू पंचांगानुसार, दिवाळीची (Diwali 2025) धमाकेदार सुरुवात झाली आहे. तर, आज धनत्रयोदशीचा (Dhanteras 2025) दिवस साजरा केला जातोय. आजच्या दिवशी भगवान धन्वंतरी आणि कुबेर महाराजाची पूजा केली जाते. ज्योतिष शास्त्रानुसार, यंदा धनत्रयोदशीला एक मोठा दुर्लभ संयोग जुळून आला आहे. कारण आजच्या दिवशी शनि त्रयोदशी (Shani Dev) तिथीमध्ये धनत्रयोदशीचा संयोग जुळून आला आहे. तसेच, आज शनि प्रदोषसुद्धा आहे. त्यामुळे आजचा धनत्रयोदशीचा दिवस 5 राशींच्या अडचणी कमी करु शकतो. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात. 

Continues below advertisement

शनीच्या मीन राशीत संक्रमण केल्यानंतर सिंह आणि धनु राशीवर शनीची ढैय्या सुरु आहे. तर, मेष, कुंभ आणि मीन राशीच्या लोकांवर शनीच्या साडेसातीचा प्रभाव आहे. यामुळे 5 राशींच्या लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. पण, धनत्रयोदशीच्या दिवशी या राशींना चांगला लाभ मिळू शकतो. 

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायी असणार आहे. या काळात तुम्हाला कर्ज आणि खर्चाच्या समस्यांपासून तुम्हाला सुटका मिळू शकते. तसेच, संपत्तीत तुमची बरकत होईल. तुमची सरकारी कामं जी अनेक दिवसांपासून रखडली होती त्यांना चांगली गती मिळेल. दिवसभरात तुम्हाला शुभवार्ता मिळू शकते. 

Continues below advertisement

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीसाठीसुद्धा आजचा दिवस लाभदायी ठरणार आहे. तुमच्या नात्यात सुरु असलेले वाद हळुहळू दूर होतील. पार्टनरबरोबर चांगले संबंध निर्माण होतील. तसेच, कुटुंबियांबरोबर तुम्ही चांगला वेळ घालवाल. नशिबाची तुम्हाला चांगली साथ मिळेल. 

धनु रास (Saggitarius Horoscope)

धनु राशीसाठी आज धनत्रयोदशीचा दिवस फार लाभदायी असणार आहे. या काळात तुमच्या भौतिक सुख-समृद्धीत चांगली वाढ झालेली दिसेल. जर तुम्हाला अनेक दिवसांपासून घर किंवा प्रॉपर्टी विकत घेत असाल तर तुमचं हे स्वप्न लवकर पूर्ण होऊ शकतं. 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीसाठी आजचा दिवस भाग्याचा असणार आहे. या काळात तुम्हाला करिअरच्या आणि रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतील. नोकरदार वर्गातील लोकांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या व्यवसायात तुम्हाला चांगला लाभ मिळेल. 

मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस भाग्याचा असणार आहे. आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. तुमचा दिर्घकालीन आजार लवकर बरा होऊ शकतो. तसेच, तुमचा खर्चदेखील कमी होऊ शकतो. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :

Weekly Horoscope : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशींसाठी ऑक्टोबरचा नवीन आठवडा कसा असेल? दिवाळीत कोणत्या राशींना मिळणार बोनस? साप्ताहिक राशीभविष्य