Vinayaka Chaturthi 2022 : हिंदू पंचांगानुसार, चतुर्थी तिथी (शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष) प्रत्येक महिन्यात दोनदा येते. अमावस्या नंतरच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी ही विनायक चतुर्थी (Vinayaka Chaturthi 2022) म्हणून ओळखली जाते आणि पौर्णिमेनंतर कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी म्हणतात. या दोन्ही तारखा गणपतीच्या पूजेसाठी (Ganesh Pooja) समर्पित आहेत.


श्रीगणेशाची पूजा करण्यासाठी 'हा' दिवस अतिशय शुभ 
वर्षातील शेवटची विनायक चतुर्थी सोमवार आज म्हणजेच 26 डिसेंबर 2022 रोजी आहे. श्रीगणेशाची पूजा करण्यासाठी हा दिवस अतिशय शुभ मानला जातो, कारण या दिवशी अनेक शुभ योग तयार होत आहेत. विनायक चतुर्थीला गणेशाची पूजा करून उपवास केला जातो. जाणून घ्या विनायक चतुर्थीची पूजा पद्धत, मुहूर्त, शुभ योग


विनायक चतुर्थी तारीख आणि शुभ वेळ
पौष शुक्ल पक्ष चतुर्थी तारीख - 26 डिसेंबर 2022, सोमवार सकाळी 04:51 पासून
पौष शुक्ल पक्ष चतुर्थी तिथी समाप्ती - 27 डिसेंबर 2022, मंगळवारी रात्री 01:37 वाजता
विनायक चतुर्थी तिथी- तिथीनुसार 26 डिसेंबर 2022 रोजी विनायक चतुर्थी व्रत आणि पूजा केली जाईल.
विनायक चतुर्थी पूजा मुहूर्त - सकाळी 11:20 ते दुपारी 01:24


विनायक चतुर्थी 2022 शुभ योग


सर्वार्थ सिद्धी योग - सकाळी 07:12 ते दुपारी 04:42 पर्यंत
रवि योग - सकाळी 07:12 ते दुपारी 04:42 पर्यंत
अभिजित मुहूर्त - दुपारी 12:01 ते 12:42 पर्यंत
अमृत ​​काल - सकाळी 07:27 ते 08:52 पर्यंत


विनायक चतुर्थी पूजा विधी


विनायक चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ करून स्वच्छ कपडे घालावे. सर्वप्रथम सूर्यदेवाला पाण्याने अर्घ्य द्यावे, त्यानंतर घरातील मंदिरात दिवा लावून श्री गणेशाच्या पूजेची तयारी करा. गणपतीला नारळ, प्रसाद, मोदक, गुलाब किंवा झेंडूचे फूल, दुर्वा, कुंकू, पंचमेवा इत्यादी अर्पण करा आणि धूप-दीप लावा. पूजेनंतर गणेशाची आरतीही करावी. भगवान गणेशाच्या मंत्राचा 'ओम गं गं ग्लौं हरिद्रा गणपतये वरद वरद सर्वजन हृदये स्तम्भय स्वाहा' किंवा 'ओम गं गणपतये नमः' या मंत्राचा किमान 27 वेळा जप करा.


विनायक चतुर्थीचे महत्त्व
विनायक चतुर्थीचा दिवस धर्मग्रंथात महत्त्वाचा आहे. विनायक चतुर्थीचे व्रत जो श्रीगणेशाची आराधना करतो आणि उपवास करतो. त्याला सुख, समृद्धी, ऐश्वर्य, वैभव, कीर्ती आणि ऐश्वर्य प्राप्त होते, असा विश्वास आहे. तसेच विघ्नहर्ता गणेशाच्या कृपेने सर्व दु:ख दूर होतात.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


संबंधित बातम्या


Astrology : 'या' राशीचे लोक पैशाच्या बाबतीत असतात भाग्यवान! कधीही नसते संपत्तीची कमतरता