Venus Transit May 2022 : शुक्र 23 मे 2022 रोजी मेष राशीत प्रवेश करणार आहे. मंगळ हा मेष राशीचा स्वामी आहे. मंगळ हा उग्र मानला जातो. विशेष म्हणजे अशुभ ग्रह राहू आधीच मेष राशीत बसला आहे, इथे राहू-शुक्र संयोग दिसणार आहे, ज्याचा विशेषत: या राशींवर परिणाम होईल. जाणून घ्या
मेष (Aries) : मेष राशीच्या लोकांवर याचा सकारात्मक प्रभाव राहील. शुक्र आता मेष राशीत प्रवेश करणार आहे. शुक्र हा ऐशोआरामाच्या जीवनाचा कारक मानला जातो. मात्र शुक्राच्या प्रवेशामुळे ते कमी होऊ शकते. पैशांच्या बचतीसाठीही ठोस पावले उचलावी लागतील. कर्ज घेण्याची आणि देण्याची परिस्थिती टाळावी लागेल.
कर्क (Cancer) : प्रेम संबंधात अडचणी येऊ शकतात. वैवाहिक जीवनात अडथळे येऊ शकतात. या काळात खर्चही वाढू शकतो. यावर मात करावी लागेल. अन्यथा, पैशाच्या खर्चामुळे मानसिक तणाव निर्माण होऊ शकतो. तुम्ही येत्या काही दिवसात प्रवासाची योजना देखील करू शकता.
तूळ (Libra) : शुक्राच्या या संक्रमणामध्ये तूळ राशीच्या लोकांचा आनंद आणि रोमान्सकडे अधिक कल राहील. या काळात तुम्हाला व्यवसायात नफा होण्याची शक्यता आहे. नवीन काम सुरू करू शकाल. या दरम्यान अचानक धनलाभही होऊ शकतो. व्यावसायिक करारही करता येतील.
मकर (Capricorn) : या राशीच्या लोकांच्या प्रेम आणि नातेसंबंधांच्या बाबतीत शुक्राचे संक्रमण अनुकूल राहील. मात्र आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आरोग्याबाबत काही समस्यांना सामोरे जावे लागेल. शुगरची समस्या असल्यास ती गांभीर्याने घ्या आणि शिस्तबद्ध जीवनशैलीचा अवलंब करा. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. संबंध मजबूत होतील आणि एकमेकांना समजून घेण्यास मदत होईल. आईचे आरोग्य चिंतेचे कारण असू शकते. वाणीतील दोष टाळावे लागतील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)
महत्त्वाच्या बातम्या :
- 'या' राशीच्या लोकांना त्रास देण्यासाठी येणार शनि, चुकूनही करून नका 'हे' काम
- Mars Transit 2022 : 'या' राशींच्या लोकांच्या वाढणार अडचणी
- Astrology : 'या' राशींच्या व्यक्ती पैशांचा करतात योग्य वापर