Vat Purnima 2024 : ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा ही वटपौर्णिमा (Vat Purnima) या नावाने ओळखली जाते. या दिवशी सुवासिनी महिला वडाच्या झाडाची अगदी मनोभावे पूजा करतात आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. पण, आपल्यापैकी अजूनही असे बरेच जण आहेत ज्यांना या दिवलाचं पारंपरिक महत्त्व आणि त्यामागची कथा नेमकी काय आहे हे माहीतच नाही. याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. 


वटपौर्णिमा पूजेचा शुभ मुहूर्त (Vat Purnima 2024 Shubh Muhurta)


वडाच्या झाडाला पूजण्यासाठी 21 जून रोजी सकाळी 5 वाजून 24 मिनिटांनी ते 10 वाजून 30 मिनिटांपर्यंत असणार आहे.


वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा का केली जाते?


पौराणिक कथेनुसार, देवी सावित्रीने पतीचे प्राण वाचवण्यासाठी कठोर तपश्चर्या केली. देवी सावित्रीच्या पवित्रता आणि पतिव्रता पाहून प्रसन्न होऊन यमराजाने वटवृक्षाखालीच पती सत्यवानाचे प्राण परत केले. याबरोबरच वडाच्या झाडाची पूजा करणाऱ्या विवाहित महिलेचा पती अकाली मरण पावणार नाही तो दीर्घायुष्य जगेल, असे वरदान त्यांनी दिले. म्हणूनच या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते.


वटपौर्णिमेच्या दिवशी चुकूनही 'या' चुका करू नका 



  • वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाला इजा करू नये, त्याची फांदी तोडू नये. जर तुम्ही वटवृक्षाच्या फांदीची पूजा करणार असाल तर एक दिवस आधी म्हणजे आजच फांदी तोडून घरी आणा.

  • वटपौर्णिमेच्या दिवशी काळ्या किंवा निळ्या रंगाचे कपडे परिधान करू नये. कारण, या दिवशी काळ्या रंगाचे तसेच निळ्या रंगाचे कपडे परिधान करणं अशुभ मानले जाते. तसेच, विवाहीत महिला या दिवशी लाल, हिरवा, पिवळा अशा शुभ रंगाच्या साड्या परिधान करू शकतात.  

  • वटपौर्णिमेच्या दिवशी घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा अपमान करू नका. या दिवशी पूजा केल्यानंतर ज्येष्ठांचे आशीर्वाद घ्यायला विसरू नका. 

  • गर्भवती स्त्रियांनी वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालू नये.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:


Vat Purnima 2024 : पती सत्यवानासाठी सावित्रीने केलं वटसावित्रीचं व्रत; जाणून घ्या वटपौर्णिमेची पारंपरिक कथा आणि महत्त्व