Tulsi Ke Upay : भारतात शतकानुशतकं औषधी गुणधर्मांसाठी ओळखली जाणाऱ्या तुळशीच्या रोपाचं फार महत्व आहे. घरासमोर किंवा घरात तुळशीचं रोप लावणं हे अतिशय पवित्र समजलं जातं. शास्त्रानुसार तुळशीच्या रोपामध्ये लक्ष्मीचा वास असतो. तिची यथोचित पूजा केल्याने विष्णू देव खूप प्रसन्न होतात. विष्णू देवाला तुळशी अत्यंत प्रिय आहे. तुळशीच्या पानांनी समाविष्ट नैवेद्याशिवाय ते आपलं भोजन स्वीकारत नाही.


बदलत्या ऋतुमानानुसार तुळशीचं नीट संगोपन करावं लागतं, पण बऱ्याचदा तुळशीचं रोप हवामान किंवा इतर कारणांमुळे सुकतं, म्हणून आपण ते काढून टाकतो आणि त्या ठिकाणी दुसरं रोप लावतो. काही जण सुकलेलं तुळशीचं  रोप पाण्यात विसर्जित करतात. पण सुकलेलं तुळशीचं रोप फेकून देण्याऐवजी तुम्ही यासंबंधित काही उपाय (Tulsi Remedies) करू शकता. यामुळे लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल आणि घर नेहमी धनधान्याने भरलेलं राहील.


तुळस सुकली असेल तर करा हे उपाय


सुकलेल्या तुळशीच्या 7 लहान काड्या गोळा करा. यानंतर त्या पांढऱ्या धाग्याने बांधा. यानंतर त्या तुपात चांगल्या बुडवून घ्या आणि नंतर त्या विष्णू देवासमोर जाळा. असं केल्याने तुम्हाला विष्णू देवाचा तसेच लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद प्राप्त होईल. कोणत्याही महिन्यातील कृष्ण आणि शुक्ल पक्षातील एकादशी किंवा त्रयोदशी तिथीला हा उपाय करणं अधिक शुभ मानलं जातं .


तुळशीच्या सुकलेल्या देठाचा आणखी एक उपाय


तुळशीचे थोडे सुकलेले देठ घ्या, त्याचा एक बंडल बनवा आणि तो कापूस किंवा पांढऱ्या धाग्याने बांधा. यानंतर तो नदी किंवा तलावाच्या पाण्यात विसर्जित करा. त्यानंतर दर आठवड्याला घरात गंगाजल शिंपडा. असं केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते.


तुळशीच्या सुकलेल्या देठांचा तिसरा उपाय


तुळस सुकली की तिची सुकलेली पानं काढून टाकावी आणि उरलेले देठ स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावे आणि नंतर स्वच्छ पांढऱ्या कपड्यात ते बांधून ठेवा. यानंतर घराच्या प्रवेशद्वारावर बांधा. असं केल्याने घरात सुख-शांती कायम राहते आणि घरात सकारात्मक उर्जा प्रवेश करते.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:     


Shani Gochar 2025 : शनि आणि सूर्याची लवकरच शुभ दृष्टी; 4 डिसेंबरपासून 3 राशींना सोन्याचे दिवस, अपार धनलाभाचे संकेत