Vastu Tips : वास्तूशास्त्रानुसार (Vastu Tips), घरी मोरपंख (Peacock Feather) ठेवणं शुभ मानलं जातं. ज्या घरात मोरपंख असतो त्या ठिकाणी श्रीकृष्णाची कृपा असते. या व्यतिरिक्त मोरपंख घरात ठेवल्याने आर्थिक स्थिती मजबूत होते. वास्तूशास्त्रानुसार, घरात मोरपंख ठेवल्याने तुम्हाला चांगलं पुण्य मिळतं आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा वावर होतो.
पण, तुम्हाला माहीत आहे, मोरपंखाचा शुभ प्रभाव तेव्हाच तुमच्यावर पडेल जेव्हा तुम्ही तो योग्य दिशेला ठेवाल. मोरपंख कोणत्या दिशेला आणि कोणत्या जागेवर ठेवू नये या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
'या' दिशेला मोरपंख ठेवू नका
वास्तूशास्त्रानुसार, जर तुम्ही उत्तर-पूर्व दिशेला मोरपंख ठेवत असाल तर त्यामुळे तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जेचा वावर होतो. मोरपंखाला उत्तर-पूर्व दिशेला ठेवल्याने तुमचं आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते. तसेच, तुमच्या खर्चात वाढ होऊ शकते. अशातच वास्तूशास्त्रानुसार, उत्तर-पूर्व दिशेला मोरपंख ठेवू नका. तुम्ही उत्तर दिशेला मोरपंख ठेवू शकता.
मोरपंख कधीही पर्समध्ये ठेवू नका
वास्तूशास्त्रानुसार, मोरपंख घरी ठेवल्याने तुम्हाला चांगला धनलाभ होतो. तसेच, देवी लक्ष्मीची सतत तुमच्यावर कृपा असते. पण, एक गोष्ट लक्षात ठेवा की मोरपंख कधीही पर्समध्ये ठेवू नका, यामुळे तुम्हाला धनहानी होण्याची शक्यता असते.
मोरपंखाला कधीही तिजोरीत ठेवू नका
जर तुम्ही घरातलं किंमती सामान, दागिने आणि पैसे तिजोरीत किंवा लॉकरमध्ये ठेवलं असेल तर यामध्ये मोरपंख ठेवू नका. मोरपंखाला तिजोरीत ठेवल्याने तुम्हाला प्रचंड धनहानी होऊ शकते. त्याचबरोबर असे अनेक अशुभ योग जुळून येतात ज्यामुळे तुमच्या खर्चात वाढ होऊ शकते. तसेच, यामुळे तुमच्या कर्जात देखील वाढ होऊ शकते. त्यामुळे वास्तूशास्त्रानुसार, तुम्ही मोरपंख तिजोरीत ठेवू नये.
मोरपंख स्वयंपाकघरात ठेवू नका
जर तुम्ही मोरपंख घरी ठेवत असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा की, मोरपंख कधीही स्वयंपाकघरात ठेवू नका. मोरपंख स्वयंपाकघरात ठेवल्याने घरात नकारात्मक ऊर्जेचा वावर होतो.
'ही' आहे शुभ दिशा
जर तुम्हाला घरात मोरपंख ठेवायचा असेल तर तुम्ही तो घराच्या उत्तर दिशेला ठेवू शकता. यामुळे घरात सकारात्मकता येते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :