Vastu Tips For Shami Plant : प्रत्येक झाड आणि वनस्पतीचे (Tree Vastu Shashtra) एक स्वतंत्र महत्व आहे. या वनस्पतीचे रूप, रंग, सुगंध, फळे आणि फुले हे सर्व वेगवेगळ्या ग्रहांशी (Astrology) संबंधित आहेत. कारण त्यांचा प्रभाव भिन्न आहे. वास्तुशास्त्रात (Vastu Tips) अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या केल्याने किंवा न केल्याने आपल्या जीवनावर सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही परिणाम होतात. हिरवीगार झाडे आपल्या जीवनात आशा आणि सौंदर्य आणतात. काही झाडे आपल्या घरात नशीब आणि समृद्धी आणू शकतात. शमी वनस्पती किंवा शमीचे झाड अशीच एक वनस्पती आहे. घरात फुले आणि झाडे लावण्यासाठीही वास्तुशास्त्राचा वापर केला जातो. जेव्हा तुम्ही तुमच्या घरात झाड लावत असाल तेव्हा त्या झाडांची वास्तूही पाहणे आवश्यक आहे कारण वास्तूनुसार झाडे लावल्याने घरातील ऊर्जेवर परिणाम होतो.


शमीच्या वनस्पतीबद्दल वास्तुशास्त्र काय सांगतेय?
वास्तुतज्ज्ञांच्या मते, जर तुमच्या कुंडलीत शनिदोष किंवा शनीचा प्रभाव असेल तर तुम्ही तुमच्या घरात शमीचे झाड लावावे. हा एक उत्तम वास्तु उपाय आहे. जो तुमचा शनि दोष दूर करू शकतो. पण घरात शमीचे रोप लावण्यापूर्वी शमीचे रोप कोणत्या दिशेला लावायचे? हे जाणून घेणे आवश्यक आहे. अन्यथा तुमच्या कुटुंबात नकारात्मक ऊर्जा पसरेल.


शमीचे झाड कोणत्या दिशेला असावे?
शमी वनस्पतीसाठी योग्य वास्तु दिशा दक्षिण आहे. जर पुरेसा आणि थेट सूर्यप्रकाश नसेल तर ते पूर्व किंवा ईशान्य दिशेने ठेवता येते. शनिवारी शमीचे झाड लावणे शुभ मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार हे रोप नेहमी घराच्या मुख्य दरवाजाच्या डाव्या बाजूला लावावे. यामुळे घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा येते, ज्याचा आपल्या जीवनावर चांगला प्रभाव पडतो.


-संध्याकाळी शमीच्या रोपाजवळ दिवा लावून त्याची पूजा केल्याने आर्थिक स्थिती मजबूत होते.
-45 दिवस रोज संध्याकाळी शमीच्या रोपाजवळ तुपाचा दिवा लावल्याने विवाहातील सर्व अडथळे दूर होतात.
-घराच्या ईशान्य कोपर्यात ठेवण्याचा सल्ला दिला जातो. असे केल्याने कुटुंबाला पैशाची कमतरता भासणार नाही.
-व्यवसाय आणि नोकरीमध्ये प्रगती करण्यासाठी घरात शमीचे झाड लावणे शुभ असते.
-जर तुम्ही एखाद्या शुभ कामासाठी घराबाहेर जात असाल तर शमीला पाहूनच घराबाहेर पडा. 
-असे केल्याने तुम्ही ज्या कामासाठी जात आहात त्यात यश मिळेल.


-शमी वनस्पती दैवी आणि अतिशय पवित्र आहे. त्यामुळे लागवड करताना स्वच्छ मातीच वापरावी. 
-ते लावताना दिशेची काळजी घ्या. 
-त्याचा वापर घरात करू नये. शमीचे रोप दक्षिण दिशेला टेरेसवर ठेवा. 
-सूर्यप्रकाश मिळत नसेल तर पूर्व दिशेलाही लागवड करता येते.
-घराच्या मुख्य दरवाजाजवळ शमीचे रोप देखील लावू शकता. 
-तुम्ही ही वनस्पती एका भांड्यात किंवा थेट जमिनीत लावू शकता.


 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


महत्वाच्या बातम्या


Numerology : 'या' तारखेला जन्मलेले लोक धनसंपत्तीच्या बाबतील असतात खूप भाग्यवान, सदैव असतो कुबेराचा आशीर्वाद