Vastu Tips : अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की, तुम्ही खूप मेहनत करता पण तरीही तुम्हाला यश मिळत नाही. असे घडते कारण नकारात्मक शक्ती तुम्हाला यशस्वी होऊ देत नाहीत. अशावेळी मन अस्वस्थ होते. कधीकधी तुमचा स्वतःवरचा विश्वास कमी होतो. पण वास्तुशास्त्रात (Vastu Shashtra) या समस्येवर उपाय आहे. वास्तुशास्त्रात असे अनेक मार्ग आहेत, ज्याद्वारे तुम्ही नकारात्मक ऊर्जा स्वतःपासून आणि घरापासून दूर ठेवू शकता. वास्तुशास्त्रानुसार 7 धावत्या घोड्यांची पेंटिंग लावल्याने तुम्हाला अनेक बाबतीत यश मिळू शकते. तुम्ही कधी विचार केला आहे का? की पेंटिंगमध्ये फक्त 7 धावणारे घोडेच का दाखवले जातात? (7 Horse Painting) वास्तुशास्त्रानुसार, 7 संख्या ही नैसर्गिक आणि नशीबवान मानली जाते. आठवड्यातील सात दिवसांप्रमाणे इंद्रधनुष्याचे सात रंग, सप्तर्षी, लग्नातील सप्तपदी, सात जन्माप्रमाणेच सात घोड्यांचे चित्र सर्वोत्तम मानले जाते. पण, वास्तूनुसार योग्य दिशेने लावल्यास चांगले परिणाम मिळतात. घोड्यांचे हे पेंटिंग कोणत्या दिशेला लावायचे ते जाणून घ्या



7 धावणाऱ्या घोड्यांच्या पेंटिंगची योग्य दिशा कोणती?


-घरामध्ये सात घोड्यांच्या रथावर सूर्य देवाचे चित्र लावल्यास ते खूप शुभ असते. जर तुम्हाला शुभ परिणाम हवे असतील तर तुम्ही हे चित्र पूर्व दिशेला लावावे.


-जर तुम्ही शेतात चांगल्या उत्पन्नाची वाट पाहत असाल, तर घराच्या उत्तर दिशेला धावणाऱ्या घोड्यांचे चित्र लावणे शुभ मानले जाते.


-जीवनात नाव, कीर्ती आणि मान-सन्मान मिळवायचा असेल तर घराच्या दक्षिण दिशेला धावणाऱ्या घोड्यांचे चित्र लावा. यामुळे तुमची जीवनात झटपट प्रगती होईल आणि तुमच्या कामाचे कौतुक होईल.


-जर तुम्हाला दक्षिण दिशेला धावणाऱ्या घोड्यांचे चित्र लावता येत नसेल, तर घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या खिडकीवर धावत्या घोड्याची मूर्ती ठेवू शकता. फक्त घोड्याचा चेहरा खिडकीतून बाहेर पाहत असल्याची खात्री करा.


-जर तुम्ही कर्जामुळे त्रस्त असाल तर पश्चिम दिशेला कृत्रिम घोड्याच्या जोडीची मुर्ती ठेवावी. यामुळे घरात सुख, समृद्धी आणि लक्ष्मी सदैव वास करते.


-पांढरे घोडे सकारात्मक उर्जेचे प्रतीक आहेत. हे चित्र कुठेही लावले तरी लक्षात ठेवा की त्यात घोडे पांढरे आहेत. यामुळे घर आणि ऑफिसमधील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा मिळते.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


महत्वाच्या बातम्या


Numerology : 'या' तारखेला जन्मलेले लोक धनसंपत्तीच्या बाबतील असतात खूप भाग्यवान, सदैव असतो कुबेराचा आशीर्वाद