Vastu Tips For Temple In Home : तुम्ही अनेकांच्या घरात लाकडी देव्हारा पाहिला असेल. आजकाल बदलत्या काळानुसार घरात लाकडी देव्हारा ठेवण्याचा ट्रेंड खूप वाढला आहे. घरात लाकडी देव्हारा ठेवण्याचं एक कारण म्हणजे छोटी घरं आणि फॅन्सी ट्रेंड. परंतु वास्तुशास्त्रानुसार, घरात देव्हारा ठेवण्याचे अनेक नियम आहेत, जे तुम्ही पाळले नाही तर तुम्हाला वाईट परिणामांना सामोरं जावं लागेल. तर आज याच वास्तु शास्त्रातील (Vastu Tips) नियमांबद्दल जाणून घेऊया.


लाकूड कोणत्या झाडाचं आहे याचा होतो परिणाम


घरात ठेवलेला लाकडी देव्हारा ज्या लाकडापासून बनवलेला असतो, यावर तो शुभ की अशुभ हे अवलंबून असतं. वास्तुशास्त्रानुसार काही झाडांचं लाकूड शुभ मानलं जातं आणि जर या लाकडापासून घरगुती देव्हारा बनवला असेल तर तो देव्हारा शुभ ठरतो. परंतु या लाकडी देव्हाऱ्याला बुरशी लागू नये, हे लक्षात ठेवा.


देव्हारा भिंतीवर टांगू नका


साधारणपणे घरामध्ये जागेच्या कमतरतेमुळे काही लोक घराच्या भिंतीवर लाकडी देव्हारा लटकवतात. परंतु वास्तुशास्त्रानुसार, भिंतीवर देव्हारा लटकवल्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होत नाही. लाकडी देव्हारा भिंतीवर लटकवायचा असेल तर तो सुरक्षित ठिकाणी असावा. जर तुमच्या घरात जागेची कमतरता असेल तर छोटा देव्हारा ठेवा, पण तो जमिनीवर ठेवा.


देव्हाऱ्यासाठी पूर्व-पश्चिम दिशा शुभ


शक्य असल्यास, पूर्व दिशेला लाकडी देव्हारा स्थापित करा. जेव्हा तुम्ही देव्हाऱ्यात पूजा करता तेव्हा तुमचं तोंड पूर्वेकडे आणि तुमची पाठ पश्चिमेकडे असावी. वास्तुशास्त्रानुसार, देव्हारा ठेवण्यासाठी पूर्वेशिवाय उत्तर दिशा देखील चांगली मानली जाते.


लाकडी देव्हाराात पिवळे किंवा लाल कापड जरूर पसरवा


जर तुम्हाला तुमच्या घरात लाकडी देव्हारा ठेवायचा असेल तर लाकडी देव्हाऱ्यात पिवळं किंवा लाल रंगाचं कापड पसरवा, ते फार शुभ ठरतं. देवाची मूर्ती किंवा फोटो थेट लाकडी फळीवर ठेवू नका, तर आधी त्याखाली कापड पसरवा आणि मगच त्यावर देवाची मूर्ती किंवा फोटो ठेवा.


लाकडी देव्हाऱ्यात धूळ, माती किंवा वाळवी लागू देऊ नका


घरातील देव्हारा हा नेहमी स्वच्छ ठेवला पाहिजे. लाकडी देव्हाराात कुठेही धूळ, माती किंवा वाळवी असू नये, याची काळजी घ्यावी, यामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते. लाकडी देव्हारा जुना झाल्यावर त्यावर वाळवी लागू देऊ नका, देव्हाऱ्याची वेळोवेळी तपासणी करावी.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:


Vastu Tips : तुळशीच्या बाजूला लावा फक्त 'ही' छोटी रोपं; काही दिवसांत दिसेल जादू, धनात होईल डबल वाढ