Vastu Tips For Wall Clock : आपल्या सर्वांच्याच घरात काही गोष्टींचं असणं अगदी गरजेचंच असतं. घड्याळ (Clock) ही त्यापैकीच एक गोष्ट आहे. वास्तूशास्त्रानुसार (Vastu Shastra), घरात घड्याळ असणं फार गरजेचं आहे. तसेच, या घड्याळाची दिशा देखील योग्य असणं गरजेचं आहे. जर, घरातील घड्याळ योग्य दिशेला नसेल तर वास्तूदोष लागण्याची शक्यता असते. तसेच, जर घड्याळ चुकीच्या दिशेला असेल तर आर्थिक, मानसिक आणि शारीरिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. घड्याळा संबंधित वास्तूशास्त्रात (Vastu Tips) काय म्हटलंय ते जाणून घेऊयात. 

Continues below advertisement

'ही' दिशा घड्याळासाठी योग्य 

घड्याळाला नेहमीच पूर्व किंवा उत्तर दिशेला लावणं गरजेचं आहे. पूर्व किंवा उत्तर दिशेला घड्याळ लावणं शुभ मानलं जातं. 

हलक्या रंगाचं घड्याळ घरात लावावं 

वास्तूशास्त्रानुसार, घरात हलक्या रंगाचं घड्याळ लावावं. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा वावर होतो. तसेच, जर घरात गडद रंगाचं घड्याळ लावलं तर घरात नकारात्मक ऊर्जा पसरू शकते. 

Continues below advertisement

घरात बंद घड्याळ ठेवू नका

वास्तूशास्त्रात सांगितल्याप्रमाणे, घरात कधीही बंद पडलेलं घड्याळ ठेवू नये. घरात बंद घड्याळ ठेवल्याने घरातील वातावरण बिघडू शकते. जर, तुमच्या घरात बंद घड्याळ असेल तर ते आत्ताच फेकून द्या किंवा जर बिघडलं असेल तर लवकरात लवकर दुरुस्त करून घ्या. 

या दिशेला घड्याळ कधीच लावू नये 

वास्तूशास्त्रानुसार, घड्याळाला दक्षिण आणि पश्चिम दिशेला लावणं चुकीचं मानलं जातं. या दिशेला घड्याळ लावल्याने घरात नकारात्मक ऊर्जेचा वावर होतो. 

तुटलेलं घड्याळ घरात ठेवू नका 

वास्तूशास्त्रानुसार, घरात कधीही तुटलेलं घड्याळ ठेवू नये. तुटलेलं घड्याळ घरात ठेवल्याने घरातील वातावरण बिघडण्याची दाट शक्यता असते. तसेच, तुटलेल्या घड्याळाला दुर्भाग्याशी जोडले जाते. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :                                                                                   

Weekly Horoscope : तूळ ते मीन राशींसाठी नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा ठरणार गेमचेंजर; हातात पैसा येणार की जाणार? साप्ताहिक राशीभविष्य