Vastu Tips For New Year 2023 : वर्ष 2022 (Year 2022) चा निरोप घेण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. अशा परिस्थितीत आता प्रत्येकाला आशा आहे की, 2023 मध्ये आयुष्यात सर्वकाही चांगले होईल. नवीन वर्ष 2023 (New Year) च्या आगमनाची आतुरता सध्या सर्वांनाच आहे. यामुळे लोकांमध्ये नवी ऊर्जा आणि उत्साह संचारला आहे. जर तुम्हालाही 2023 मध्ये सर्वकाही चांगले व्हावे असे वाटत असेल, तर काही वास्तु टिप्स (Vastu Tips) स्वीकारणे आवश्यक आहे.
पैशाची कमतरता भासणार नाही
वास्तुशास्त्रानुसार येणाऱ्या नवीन वर्षाच्या सुरुवातीपूर्वी घरात अशा काही गोष्टी आणा ज्या खूप शुभ मानल्या जातात. ज्यामुळे घरात सुख-समृद्धी नांदते. नकारात्मकतेची जागा सकारात्मकतेने घेते. वास्तुशास्त्रात अशा अनेक शुभ गोष्टी सांगितल्या आहेत, त्या घरात आणल्याने गरिबी दूर होते आणि सकारात्मक उर्जा संचारते. या गोष्टी घरात ठेवल्या म्हणजे घरात कोणत्याही रुपात पैशाची कमतरता भासू शकत नाही. कोणत्या गोष्टी आहेत त्या? ते जाणून घ्या
मोराचे पंख
भगवान श्रीकृष्णाला मोराचे पंख खूप प्रिय आहे, घरात मोराचे पिसे ठेवले तर तिथे देवी लक्ष्मीचा वास असतो. नवीन वर्षात तुम्हाला तुमच्या आयुष्यात सुख-समृद्धी हवी असेल तर मोराची पिसे घरात ठेवा.
तुळशीचे रोप
हिंदू धर्मात तुळशीची वनस्पती सर्वात पवित्र मानली जाते. असे मानले जाते की, ज्या घरात हिरवे तुळशीचे रोप असते तिथे कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता नसते आणि ते घर धनधान्याने भरलेले असते. जर तुमच्या घरात तुळस नसेल किंवा ती सुकली असेल तर या वर्षी तुळशीचे रोप घरी आणा.
चांदीचा हत्ती
नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी घरात चांदीचा हत्ती आणा. ज्योतिषशास्त्रानुसार चांदीच्या हत्तीचा चमत्कारिक प्रभाव असतो. हा ठेवल्याने राहू आणि केतूचा अशुभ प्रभाव संपतो, तसेच व्यवसाय आणि नोकरीत प्रगती होते.
धातूचे कासव
नवीन वर्षाच्या आधी, तुमच्या घरी धातूचे कासव नक्कीच आणा. अनेकदा लोक माती किंवा लाकडी कासव आणतात. घरात कुठेही ठेवतात जे चांगले नसते. चांदी, पितळ किंवा कांस्य धातूपासून बनवलेले कासव घरात ठेवणे शुभ असते. उत्तर दिशेला ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा संपते आणि देवी लक्ष्मीची कृपा होते.
लाफिंग बुढ्ढा
नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर तुम्ही लाफिंग बुढ्ढा घरी आणू शकता. लाफिंग बुढ्ढा आणताना नेहमी ईशान्य दिशेला ठेवा. यामुळे घरात ठेवल्याने कधीही पैशाची कमतरता भासत नाही.
लहान नारळ
तुम्ही छोटे नारळ घरी आणा, ते कापडात गुंडाळून तिजोरीत ठेवा. ते दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी बाहेर काढा आणि नदीत किंवा तलावात विसर्जित करा. असे केल्यास देवी लक्ष्मी तुमच्या घरात दीर्घकाळ वास करते. विसर्जनानंतर दुसरा नारळ तिजोरीत ठेवता येतो.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
संबंधित बातम्या