Vastu Tips For Money : आपल्यापैकी बराच जणांना हा अनुभव आला असेल की पाकिटात पैसे ठेवल्या ठेवल्या अगदी काही काळात ते गायब होतात. वास्तुशास्त्रात याच सगळ्या गोष्टींवर काही उपाय सांगितले गेले आहेत. तुमचं जीवन सुधारण्यासाठी, पैशाच्या कमतरतेवर मात करण्यासाठी असे अनेक उपाय सांगितले आहेत, जे एखाद्या व्यक्तीसाठी खूप उपयुक्त ठरू शकतात. पाकिटाशी संबंधित देखील असे वास्तु उपाय आहेत, जे केल्यास पैशाचा ओघ वाढू शकतो. काही लोकांची पाकिटं फाटलेली असतात, तर काही लोक निरुपयोगी वस्तू पर्समध्ये ठेवतात, अशा लोकांना आर्थिकदृष्ट्या अनेक आव्हानांना सामोरं जावं लागू शकतं. आपल्या पर्सला नकारात्मक ऊर्जेपासून दूर कसं ठेवायचं? आणि संपत्ती वाढवण्यासाठी कोणते उपाय केले जाऊ शकतात? याबद्दल जाणून घेऊया.
पाकिटाशी संबंधित प्रभावी उपाय
वास्तुशास्त्रानुसार, जर एखाद्या व्यक्तीने आपल्या पर्समध्ये फाटलेल्या नोटा, फोटो किंवा खराब झालेले कागद ठेवले तर त्याच्या पर्समध्ये पैसे राहत नाहीत. पैशाची आवक कमी होऊ लागते. अशा स्थितीत, पर्स नेहमी स्वच्छ ठेवणं आणि पर्समधून अनावश्यक गोष्टी लवकरात लवकर काढून टाकणं महत्वाचं आहे. तुम्ही तुमच्या पर्समध्ये लक्ष्मी मातेचा कागदी फोटो ठेवू शकता, पण फोटो खराब होऊ लागताच तो बदला. तुमची पर्स कधीही नोटांशिवाय ठेवू नका, रिकामी पर्स पैशांचा ओघ थांबवू शकते.
पाकिटाशी संबंधित वास्तु टिप्स
- पर्समध्ये नाणी आणि नोटा एकत्र ठेवू नका. पर्समध्ये फक्त नोटा ठेवा. तुम्ही नाणी दुसऱ्या खिशात ठेवू शकता.
- फाटलेली पर्स ताबडतोब स्वतःहून वापरणं थांबवा.
- पर्समध्ये नेहमी व्यवस्थित आणि खुल्या पद्धतीने पैसे ठेवा, फोल्ड केलेल्या नोटांमुळे आर्थिक नुकसान होऊ शकतं.
- तुम्ही तुमच्या पर्समध्ये श्रीयंत्र ठेवू शकता, जे देवी लक्ष्मीचं भौतिक रूप आहे.
- तुमची पर्स नेहमी पैशाने भरलेली असेल याची खात्री करण्यासाठी त्यात तांदळाचे काही दाणे ठेवा.
- तुमच्या पर्समध्ये कोणतेही जुने बिल ठेवू नका.
- पर्समध्ये लक्ष्मी शिवाय इतर कोणत्याही देवी-देवतांचे फोटो किंवा पूर्वजांचे फोटो ठेवू नका.
हेही वाचा: