Maha Kumbh 2025 : तब्बल 114 वर्षांनंतर तीर्थक्षेत्र प्रयागराजमध्ये पूर्ण कुंभाचा दुर्मिळ योग जुळून आला आहे. महाकुंभ दर 12 वर्षांनी होतो आणि जेव्हा 12 वर्षांचा 12वा टप्पा पूर्ण होतो तेव्हा त्याला पूर्ण कुंभ म्हणतात. प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक या चार पवित्र स्थळांवर दर 12 वर्षांनी कुंभमेळ्याचं आयोजन केलं जातं. यंदाचा कुंभमेळा प्रयागराजमध्ये 13 जानेवारी 2025 पासून सुरू झाला आहे आणि दररोज लाखो भाविक गंगा मातेत स्नान करण्यासाठी येत आहेत.
तब्बल 144 वर्षांनी भरला महाकुंभ
कुंभमेळ्याचं आयोजन हे ग्रह आणि नक्षत्रांच्या स्थितीच्या आधारावर केलं जातं. जेव्हा सूर्य, चंद्र आणि बृहस्पति एका विशिष्ट स्थितीत असतो, जेव्हा गुरु वृषभ राशीत असतो आणि सूर्य आणि चंद्र इतर शुभ स्थानात असतात, तेव्हा तो महाकुंभाचा काळ बनतो आणि हा संयोग प्रत्येक 144 वर्षांनी एकदा येतो. यासोबतच महाकुंभावर पौर्णिमा, रवियोग, भाद्रास योगही तयार होणार असून, त्याचा शुभ प्रभाव लोकांवर पडणार आहे.
13 आखाड्यांचे ऋषी आणि संत कुंभमध्ये सहभागी होतात आणि नदीत स्नान करतात. नागा साधू देखील कुंभमध्ये सहभागी होतात. हे नागा साधू कसे बनतात आणि कुंभानंतर ते कुठे जातात? जाणून घेऊया.
नागा साधू कसे व्हावे?
नागा साधू बनणं इतकं सोपं नाही. यासाठी माणसाला अनेक प्रकारच्या परीक्षांना सामोरं जावं लागतं. या प्रक्रियेस 6 महिने ते 1 वर्ष लागू शकतं. या परीक्षेत यश मिळवण्यासाठी साधकाला 5 गुरूंकडून दीक्षा घ्यावी लागते. शिव, विष्णू, शक्ती, सूर्य आणि गणेश यांच्याद्वारे, ज्यांना पंचदेव म्हणूनही ओळखलं जातं.
तर नागा व्यक्तीला सांसारिक जीवनाचा त्याग करावा लागतो. तो स्वतःचं पिंड दान देखील देतो. त्याच बरोबर नागा साधूंची एक खासियत म्हणजे ते फक्त परमार्थात मिळणारे अन्नच खातात. साधूला एखाद्या दिवशी अन्न मिळालं नाही तर त्याला अन्नाशिवाय जगावं लागतं. तर नागा साधू कधीही अंगावर कपडे घालत नाहीत, ते फक्त भस्म लावतात. नागा साधू समाजातील लोकांसमोर डोकं टेकवत नाहीत किंवा आयुष्यात कोणाचीही निंदा करत नाहीत. नागा साधू कधीही वाहनं वापरत नाहीत.
कुंभानंतर नागा साधू कुठे परततात?
कुंभानंतर नागा साधू आपापल्या आखाड्यात परततात. आखाडे भारताच्या विविध भागात आहेत आणि हे साधू तेथे ध्यान, साधना आणि धार्मिक शिकवणी करतात. काही नागा साधू काशी (वाराणसी), हरिद्वार, ऋषिकेश, उज्जैन किंवा प्रयागराज यांसारख्या प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांमध्ये राहतात. त्याच वेळी, नागा साधू किंवा नवीन नागा साधू बनण्याची प्रक्रिया (दीक्षा) प्रयाग, नाशिक, हरिद्वार आणि उज्जैनच्या कुंभमध्ये केली जाते, परंतु त्यांना वेगळ्या पद्धतीचे नागा म्हटलं जातं.
उदाहरणार्थ, प्रयागमध्ये दीक्षा घेणाऱ्या नागा साधूला राजराजेश्वर म्हणतात. तर उज्जैनमध्ये दीक्षा घेणाऱ्याला खुनी नागा साधू आणि हरिद्वारमध्ये दीक्षा घेणाऱ्याला बर्फानी नागा साधू म्हणतात. यासोबतच नाशिकमध्ये दीक्षा घेतलेल्या व्यक्तीला बर्फानी आणि खिचडिया नागा साधू असं संबोधण्यात येतं.
शाही स्नानानंतर नागा साधू आखाड्यात परततात
शाही स्नानानंतर नागा साधू आपापल्या आखाड्यात जातात. प्रयागराज कुंभमध्ये तिसरं शाही स्नान 3 फेब्रुवारीला, म्हणजेच वसंत पंचमीला आहे, त्यानंतर नागा साधू आपापल्या आखाड्यात परततील.
हेही वाचा: