Vastu Tips For Money Plant : वास्तूशास्त्रात अनेक वृक्षांचं, रोपांचं, झुडुपांचं विशेष महत्त्व मानण्यात आलं आहे. या रोपांना घरी लावणं फार शुभ आणि कल्याणकारी मानलं जातं. वास्तूशास्त्रात (Vastu Shastra), मनी प्लांटशी (Money Plant) संबंधित नियमांबद्दल विस्ताराने वर्णन करण्यात आलं आहे. असं म्हणतात की, या रोपांना घरात लावल्याने घरातील वातावरण शुद्ध राहतं. आणि घरात असलेल्या वास्तूदोषापासून सुटका होते. त्याचबरोबर, घरातील सदस्यांना यामुळे अनेक प्रकारचे शुभ लाभ मिळतात. 


'या' दिशेला लावा मनी प्लांट 


जर तुम्ही तुमच्या घरात मनी प्लांट लावण्याचा विचार करत असाल तर घराची दक्षिण-पूर्व दिशा यासाठी योग्य आहे. वास्तूशास्त्रानुसार, मनी प्लांटला या दिशेला लावणं शुभ मानलं जातं. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा वावर होतो. त्याचबरोबर, तुमच्या सुख-समृद्धीत चांगली वाढ होते. याचं कारण म्हणजे, मनी प्लांटचा थेट संबंध कुबेर आणि बुध ग्रहाशी होतो. 


'या' दिशेला चुकूनही लावू नका मनी प्लांट 


जर तुम्हाला तुमच्या घरी मनी प्लांट लावायचं असेल तर तुम्ही तो उत्तर किंवा पूर्व दिशेला लावू नका. याचं कारण म्हणजे या दिशेला रोप लावल्याने घरातील सदस्यांना आर्थिक तंगीचा सामना करावा लागू शकतो. 


'या' गोष्टींची विशेष काळजी घ्या


घराच्या बाहेर मनी प्लांट लावणं अशुभ मानलं जातं. वास्तूशास्त्रानुसार, मनी प्लांटला घराच्या बाहेर लावल्याने बाहेरील लोकांची नजर त्या रोपावर जाते. यामुळे रोपाचा विकास होत नाही आणि आर्थिक तंगीचा सामना करावा लागू शकतो. 


'हे' उपाय करा 


जर तुम्हाला तुमच्या उत्पन्नात वाढ हवी असेल तर पाण्यात थोडंसं दूध घालून ते मिक्स करा आणि मनी प्लांटला अर्पण करा. असं म्हणतात की, असे उपाय केल्याने तुमच्या उत्पन्नात अधिक वाढ होईल त्याचबरोबर धनलाभाचे अद्भूत योग जुळून येतील. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हेही वाचा :


Shukra Gochar 2024 : 7 जुलैला कर्क राशीत शुक्राचं संक्रमण; 'या' 5 राशींचं आयुष्य सोन्याहून पिवळं होणार, प्रत्येक कष्टाचं फळ मिळणार