Money Plants Vastu Tips : मनी प्लांटबाबत वास्तुशास्त्रात अनेक नियम सांगितले आहेत, ज्यांचं पालन केलं तरच त्याचा पुरेपूर फायदा होऊ शकतो. त्यामुळे मनी प्लांट योग्य ठिकाणी आणि योग्य दिशेने लावावा. मनी प्लांटच्या आजूबाजूला अशा गोष्टी असू नयेत, ज्यामुळे नकारात्मकता येते. अन्यथा नफ्याऐवजी तोटा होऊ शकतो. मनी प्लांटबद्दल एक प्रचलित समज आहे की, मनी प्लांट चोरी करून लावावा. चोरीच्या मनी प्लांटमुळे (Money Plant) व्यक्तीला विशेष लाभ मिळतो. या विषयावर वास्तुशास्त्र (Vastu Tips) काय सांगते ते जाणून घेऊया.


वास्तूशास्त्र सांगते...


मनी प्लांट चोरी करून लावावा असा उल्लेख वास्तुशास्त्रात नाही, त्यामुळे नेहमी खरेदी केलेलाच मनी प्लांट लावा. असं केल्याने तुम्हाला मनी प्लांट लावल्याचा पूर्ण लाभ मिळेल. 


घरात येईल नकारात्मकता आणि गरिबी


साहजिकच चोरी करणं हे कोणत्याही धर्मात चांगलं मानलं जात नाही. मनी प्लांटचा संबंध पैसा आणि  लक्ष्मीशी आहे. अशा परिस्थितीत चोरी करून लावलेला मनी प्लांट लावल्यास देवी लक्ष्मीचा कोप होईल आणि घरात नकारात्मकता येईल.


मनी प्लांटच्या वेलीचा तुकडा इतरांना देता येतो का? 


मनी प्लांटबाबत अनेकांच्या मनात बरेच प्रश्न असतात. त्यातलाच एक, मनी प्लांटच्या वेलीचा तुकडा इतरांना देता येईल का? तर शास्त्रानुसार असं करणं चुकीचं आहे. मनी प्लांट कोणाला देऊ नये किंवा कोणाकडून घेऊही नये. नर्सरीतून मनी प्लांट विकत घ्या आणि घरीच लावा, तरच त्याचे फायदे मिळतील. 


या चुका अजिबात करू नका



  • घरामध्ये मनी प्लांट लावताना कोणतीही चूक करू नका, अन्यथा या चुकांमुळे खूप नुकसानही होतं. 

  • मनी प्लांटची वेल नेहमी वरच्या दिशेला असावी. मनी प्लांटचा वेल कधीही जमिनीला स्पर्श करणार नाही, याची काळजी घ्या. 

  • मनी प्लांट नेहमी घराच्या आग्नेय दिशेला लावा. 

  • मनी प्लांट जमिनीत लावू नका, तो मातीच्या भांड्यात किंवा काचेच्या भांड्यात लावा. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हेही वाचा :


Vastu Tips : लग्नाला विलंब, प्रगतीत अडथळे? घरात ठेवलेल्या 'या' वस्तू तर नाहीत ना जबाबदार?