Vastu Tips For Lord Ganesh Photo : ज्योतिषशास्त्रात, गणपतीला (Lord Ganesh) फार महत्त्वाचं स्थान आहे. अनेकजण रोज बाप्पाची विधीवत पूजा करतात. नैवेद्य दाखवतात. आपल्यावर आपल्या कुटुंबियांवर गणेशाचा आशीर्वाद राहावा म्हणून अनेकजण घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर गणेशाची मूर्ती बसवतात. पण, घराच्या मुख्य द्वाराजवळ गणेशाची प्रतिष्ठापना करणं शुभ की अशुभ आहे? मुख्य प्रवेशद्वारावर गणेशाची मूर्ती बसविण्याचे वास्तू नियम (Vastu Tips) नेमके कोणते आहेत ते जाणून घेऊयात. 


घराच्या 'या' दिशेला मूर्ती बसवणं शुभ 


वास्तूशास्त्रानुसार, घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ गणपतीची मूर्ती बसविणं शुभ आहे. पण, यामध्ये एक गोष्ट महत्त्वाची आहे ती म्हणजे तुमचा मुख्य दरवाजा उत्तर किंवा दक्षिण दिशेलाच असावा तरच ती मूर्ती शुभ असते. पण, ज्या घरात मुख्य प्रवेशद्वार पूर्व किंवा पश्चिम दिशेला असेल अशा घरात गणेशाची मूर्ती बसवू नये. 


मूर्तीची प्रतिष्ठापना कशी करावी? 


गणेशाची प्रतिष्ठापना करताना एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या की, गणपतीचे मुख हे नेहमी आतील बाजूस असावे. असं म्हणतात की, घराच्या मुख्य दारावर श्री गणेशाची मूर्ती स्थापित केल्याने घरात सकारात्मक ऊर्जैचा प्रवाह वाढतो. आणि जीवनात सुख, समृद्धी तसेच शांती येते. 


गणपतीच्या मूर्तीचा रंग कोणता असावा?


खरंतर, बाप्पा प्रत्येक रंगात, प्रत्येक आकारात आणि प्रत्येक रूपात छान आणि देखणाच दिसतो. पण वास्तूशास्त्रात म्हटल्याप्रमाणे, तुमच्या घरात जर सुख, समृद्धी आणि शांती हवी असेल तर घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर शेंदूर रंगाची गणेशाची मूर्ती ठेवणं शुभ असतं. याशिवाय गणपतीच्या हातात मोदक, लाडू किंवा बाजूला वाहन असावं असं म्हटलं आहे. 


बाप्पाची सोंड कोणत्या दिशेला असावी?


घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर जर तुम्ही गणेशाची मूर्ती बसवली असले तर एक गोष्ट मात्र लक्षात घेतली पाहिजे की, गणेशाची सोंड नेहमी डावीकडे वाकलेली असावी. तसेच, घराच्या उजव्या बाजूला वाकलेल्या सोंडेसह गणपतीचा फोटो असावा. असे असल्यास घरात सकारात्मक ऊर्जेचा वापर होतो आणि सुख-समृद्धी तसेच उत्तम आरोग्य लाभतं. वास्तूशास्त्रात, घरातील वास्तूंशी संबंधित, देव-देवतांशी संबंधित असे काही नियम सांगितले आहेत. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Vastu Tips : घराबाहेर आंब्याचं झाड लावणं शुभ की अशुभ? वास्तूशास्त्रात म्हटलंय...