Vastu Tips : घराबाहेर आंब्याचं झाड लावणं शुभ की अशुभ? वास्तूशास्त्रात म्हटलंय...
धार्मिक मान्यतेनुसार, आवळ्याचं झाड हे भगवान विष्णू यांना प्रिय आहे. आवळ्याच्या झाडावर सर्व देवतांचा वास असतो असं म्हणतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआपल्या मनातील इच्छा पूर्ण करणारं झाड अशीदेखील या झाडाची ओळख आहे. पण, जेव्हा हे झाड तुमच्या घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला असेल तेव्हाच ते लाभदायक मानलं जातं.
अशोकाच्या झाडाला अत्यंत शुभ असं मानलं जातं. वास्तुशास्त्रात असं म्हणतात की, ज्या घरासमोर हे झाड लावलं जातं तिथे सुख-शांती नांदते.
तसेच, घराबाहेर अशोकाचं झाड लावल्याने अशुभ वृक्षांचे अशुभ प्रभाव नाहीसे होतात.असंही मानलं जातं.
वास्तूशास्त्रात शमीला शुभ परिणाम देणारी वनस्पती मानले जाते. असं म्हणतात की, शमीच्या रोपाची पूजा केल्याने शनीची कृपा कुटुंबावर राहते.
पण, त्याची सावली घराबाहेर पडू नये म्हणून घराच्या मुख्य गेटच्या डावीकडे थोड्या अंतरावर बसवावी. केवळ असे केल्याने त्याचे उत्तम परिणाम मिळतात.
घराजवळ चुकूनही आंब्याचं झाड लावू नये. हे झाड मुलांसाठी हानिकारक मानले जाते.
याचं कारण म्हणजे, लहान मुले आंबे तोडण्याच्या लोभापोटी झाडावर चढून पडू शकतात. त्यामुळे दुखापत होऊ शकते. यासाठी आंब्याचं झाड घरापासून दूर लावावं
वास्तूशास्त्रानुसार, घराच्या बाहेर केळीचं झाड लावणं शुभ मानले जाते. या वनस्पतीमध्ये भगवान विष्णूचा वास असल्याचे सांगितले जाते.
दर गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा केली जाते. असं म्हणतात की ज्यांची स्मरणशक्ती कमी आहे त्यांनी केळीच्या झाडाखाली बसून अभ्यास केल्यास ते बुद्धिमान होतात.
अश्वगंधा ही एक आयुर्वेदिक वनस्पती आहे. वास्तूशास्त्रात हे झाड फार शुभ मानलं आहे. घरामध्ये जर वाद सुरु असल्यास केतूला शांत करण्यासाठी अश्वगंधाचे मूळ घरातील मंदिरात ठेवावे आणि त्याची पूजा करावी.
असं सांगितलं जातं असे केल्याने दोष नाहीसे होतात. आणि घरात सुख-शांती नांदते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)