Vastu Tips For Hanuman Photo : घरात सकारात्मक ऊर्जेचा वावर व्हावा, सुख-शांती नांदावी यासाठी घरात देव-देवतांचे फोटो लावले जातात. यामागे अर्थातच श्रद्धेचाही भाग आहेच. पण, या सगळ्या वास्तूचे (Vastu Tips) काही नियम आहेत ते जाणून घेणं गरजेचं आहे. 


असं म्हणतात की, घरात वास्तूनुसार (Vastu Shastra) देवी-देवतांचे फोटो लावले जातात, मूर्ती बसविल्या जातात. यामुळे पूजेचे फळ मिळते अशी मान्यता आहे. पूजेच्या ठिकाणी वास्तू दोषांमुळे व्यक्तीला जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. तसेच, घरात हनुमानाची (Lord Hanuman) पूजा देखील अनेक लोक करतात. त्यामुळे हनुमानाची मूर्ती कोणत्या दिशेला असावी हे जाणून घेणं देखील गरजेचं आहे. 


हनुमानाच्या मूर्तीशी संबंधित वास्तू (Vastu Tips For Hanuman Photo)



  • वास्तूनुसार, हनुमानाची मूर्ती किंवा फोटो घराच्या दक्षिण दिशेला ठेवावा. ही दिशा शुभ मानली जाते. या दिशेला फोटो लावताना हनुमानाची बसलेल्या स्थितीत असावी. हे लक्षात घ्या. असे केल्याने घरातील सर्व नकारात्मक शक्ती दूर होतात. 

  • वास्तूशास्त्रानुसार, बेडरूममध्ये हनुमानाची मूर्ती ठेवणं शुभ नाही. यामुळे वास्तूदोष होऊ शकतो. 

  • वास्तूच्या नियमांनुसार, हनुमानाच्या फोटोच्या स्वच्छतेची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. त्या फोटोची रोज पूजा करावी. तसेच, मंगळवारी सुंदरकांड पाळावे. 

  • याशिवाय वाईट शक्तींपासून मुक्ती मिळविण्यासाठी घराच्या दक्षिण दिशेच्या भिंतीवर असलेल्या स्थितीत हनुमानाचा लाल रंगाचा फोटो लावू शकता. 

  • वास्तूनुसार, हनुमानाचा फोटो किंवा मूर्ती जिन्याच्या खाली किंवा स्वयंपाकरात लावू नये. 

  • वास्तूच्या नियमांनुसार शत्रू, घरगुती त्रास, नातेसंबंधातील कलह आणि कुटुंबातील नकारात्मकता टाळण्यासाठी पंचमुखी हनुमानजींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करावी. असं म्हणतात की, मुख्य दरवाजावर पंचमुखी हनुमानाचा फोटो लावल्याने घरातून नकारात्मक ऊर्जा दूर होते. 

  • घराच्या ड्रॉईंग रूममध्ये श्री राम दरबाराची मूर्ती तुम्ही बसवू शकता. तसेच, या व्यतिरिक्त तुम्ही या खोलीत पंचमुखी हनुमानजीपर्वत उचलतानाचा फोटो देखील लावू शकता. 

  • नोकरी आणि बिझनेसमध्ये प्रगती मिळवण्यासाठी ज्या घरात अंगावर पांढरे केस आहेत त्या घरात भगवान हनुमानाचा फोटो लावावा. 


 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Vastu Tips : घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर गणेशाची मूर्ती बसविणं शुभ की अशुभ? बाप्पाची सोंड आणि दिशा कोणती असावी? वास्तूशास्त्रात म्हटलंय...