Vastu Tips : हिंदू धर्मग्रंथानुसार देवी अन्नपूर्णा अन्नात वास करते. म्हणून भोजनापूर्वी आणि नंतर अन्नपूर्णा मातेला वंदन करून त्यांचे आभार मानून अन्नाचा आदर केला पाहिजे. अन्न खाण्याशी संबंधित वेळ, पद्धत, स्थळ, दिशा इत्यादी गोष्टी वास्तुशास्त्रात (Vastu Shashtra) सांगितल्या आहेत. कारण वास्तुशास्त्रानुसार, जेवणाशी संबंधित एखादी चूक झाली तर, देवी लक्ष्मीचा कोप होऊ शकतो. अशा घराला आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो. त्यामुळे अन्नाशी संबंधित चुका त्वरित सुधारा. वास्तुनुसार जेवणानंतर काय करू नये हे जाणून घ्या
अन्नासाठी नियम
लक्ष्मी आणि देवी अन्नपूर्णा यांना प्रसन्न करायचे असेल, तर नेहमी स्वयंपाकघर स्वच्छ ठेवा आणि रात्री भांडी धुवून झोपा.
स्वयंपाकघरात जेथे पाणी ठेवण्याची जागा असेल तेथे दिवा लावा, यामुळे लक्ष्मी देवी प्रसन्न होते.
अन्न शिजवताना स्वच्छतेची काळजी घ्या. त्यामुळे नेहमी आंघोळ केल्यावरच कुटुंबातील सदस्यांसाठी अन्न शिजवावे.
वास्तुशास्त्रानुसार अन्न कधीही दक्षिणेकडे तोंड करून शिजवू नये. अन्न शिजवण्यासाठी उत्तर किंवा पूर्व दिशा शुभ मानली जाते.
अन्नाची नासाडी टाळा. अन्न वाया गेल्याने माता लक्ष्मी क्रोधित होते. त्यामुळे भूक लागेल तेवढेच जेवण ताटात वाढावे.
जर तुम्ही सक्षम असाल तर भुकेल्या आणि गरीब लोकांनाही अन्न द्या.
जेवणानंतर हे काम कधीही करू नका
हिंदू धर्म आणि वास्तुशास्त्रात असे म्हटले आहे की, अन्न खाल्ल्यानंतर कधीही ताटात हात धुवू नयेत. ज्या ताटातून ते जेवतात त्यात हात धुण्याची अनेकांना सवय असते. पण अशी सवय तुमच्याकडे गरिबी आणि दारिद्र्यता आणू शकते. कारण जेवणाच्या ताटात हात धुतल्याने देवी लक्ष्मीचा कोप होतो आणि अशा व्यक्तीला गरीब व्हायला वेळ लागत नाही. शिवाय अशी सवय गरिबीलाही आमंत्रण देते. त्यामुळे ही सवय आजच सोडून द्या.
वास्तू दोष बनतात आर्थिक संकटाचे कारण
अनेकवेळा असे घडते की, काही घरांमध्ये पैशाची सतत कमतरता असते. पती-पत्नी दोघांनी मिळून कमावल्यानंतरही घरातील आर्थिक संकट संपताना दिसत नाही. अनावश्यक गोष्टींवर पैसे खर्च होतात. तुम्हाला हवं असलं तरी थोडे पैसेही वाचवता येत नाहीत. वास्तुशास्त्राच्या नियमांनुसार, तुमच्या घरात असलेले वास्तू दोष आर्थिक संकटाचे कारण असू शकतात. वास्तुशास्त्रनुसार असे काही उपाय जाणून घ्या, जेणेकरुन तुम्ही अशा प्रकारच्या चूकांपासून दूर राहू शकता.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या :
Monthly Horoscope October 2023 : ऑक्टोबर महिन्यात 'या' राशींना अनेक लाभ, इतर राशींचे मासिक राशीभविष्य जाणून घ्या