Vastu Tips : वास्तूशास्त्रानुसार, घरात अनेकदा संकटं ओढावतात. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. अशा वेळी घरातील नकारात्मकता दूर करणं गरजेचं आहे. यासाठी स्वामी समर्थांनी या वास्तूशास्त्रा संबंधित काही उपाय सांगितले आहेत. यामुळे घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी मदत होते.
घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर काढण्यासाठी 'हे' करा
दरवाजासमोर चपलांचा ढीग लावू नका.
अनेकदा आपण घाईघाईत चपला काढून तशाच दरवाजासमोर काढून ठेवतो. अशा वेळी चपलांचा ढीग लावू नका. यामुळे घरात नकारात्मकता येते.
उंबरठ्यावर हळद आणि गोमुत्राचे लेपण करा
हा जर उपाय केल्यास घरातील नकारात्मकता दूर होते. आणि तुम्हालाच मनातून सकारात्मक वाटेल.
घरात कापूर आणि लवंग जाळा
कापराचा वापर पूजा-पाठ करण्यासाठी केला जातो. यामुळे घरात एक प्रकारे धार्मिक आणि सकारात्मक वातारण निर्माण होते. त्यामुळे हा उपाय तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.
छोटासा फिश टॅंक ठेवा
असं म्हणतात की, मासे आपल्या जीवनात येणारं दु:ख आधी स्वत:वर ओढवून घेतात. त्यामुळेच घरात छोटासा तरी फिश टॅंक नक्की ठेवावा.
किचनमध्ये गोळ्या औषधे ठेवू नका
घरातील किचन हे एक असं ठिकाण आहे जिथे नेहमीच नवीन चमचमीत पदार्थ बनवले जातात. अशा वेळी किचनमध्ये जर औषधं गोळ्या ठेवल्या तर नकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
टॉयलेटचा दरवाजा नेहमी बंद ठेवा
घरातील टॉयलेटचा दरवाजा नेहमी बंद ठेवा. कारण यामुळे घरात दुर्गंधी पसरते.
खिडक्या नेहमी उघड्या ठेवा
घरातील खिडक्या जर बंद ठेवल्या जर घरात कुबट वातावरण निर्माण होते. यामुळे घराबाहेरील सकारात्मक ऊर्जा घरात येते.
उंबरठ्याची पूजा करा
घरातील उंबरठा ही अशी जागा आहे जिथून घरात देवी लक्ष्मीचं आगमन होते. संध्याकाळच्या वेळी घराचा दरवाजा बंद ठेवला तर लक्ष्मी नाराज होते. त्यामुळे घराच्या उंबरठ्याची नेहमी पूजा करा
घरात नेहमी सकारात्मक गोष्टी बोला
घरात वारंवार नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ नये. यासाठी घरात नेहमी आनंदी वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करा.
घर नेहमी स्वच्छ ठेवा मन प्रसन्न होईल
जर तुम्हाला घरात सकारात्मक वातावरण निर्माण करायचं असेल तर घर नेहमी स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमचं मन प्रसन्न होईल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :