Vastu Tips : बाहेर जाण्यासाठी चपला किंवा बूटं घालणं ही आपल्या सर्वांसाठी सामान्य बाब आहे. पण, तुम्हाला माहित आहे का की चपला बूटांचा संबंध आपल्या नशिबाशी जोडण्यात आला आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, पायांचा संबंध मीन राशीशी जोडण्यात आला आहे. राहू आणि शनीसुद्धा पायांशी संबंधित वस्तूंशी संबंधित ग्रह आहेत. त्यामुळे पायात चपला-बूटं घातल्यास राहू-शनि ग्रह सक्रिय होतात. 

वास्तूशास्त्रानुसार, जर आपण चुकीच्या रंगाचे बूटं किंवा चपला घालत असू तर यामुळे आपल्या आयुष्यात आजारपण, आर्थिक तंगी, करिअरमध्ये समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे कशा प्रकारची चपला बूटं घालावीत ते जाणून घेऊयात. 

'या' रंगाचे चपला-बूटं घालू नका 

वास्तूशास्त्रानुसार, जर तुमच्या कुंडलीत बुध ग्रहाची स्थिती मजबूत असेल तर तुम्ही हिरव्या रंगाची बूटं वापरु नका. यामुळे तुमच्या जीवनात अनेक समस्या निर्माण होतील. त्याचप्रकारे, जर कुंडलीत मंगळ ग्रह मजबूत असेल तर लाल रंगाची बूटं वापरु नयेत. 

तसेच, ज्या लोकांच्या कुंडलीत मंगळ ग्रहाची स्थिती चांगली असेल त्यांनी पिवळ्या रंगाचे चपला-बूटं वापरु नयेत. कारण हा रंग बृहस्पतीला प्रिय आहे. 

कोणत्या रंगाचे चपला-बूटं परिधान करणं शुभ? 

वास्तूशास्त्रानुसार, बाजारात वेगवेगळ्या रंगाचे चपला-बूटं आपण पाहिले आहेत. हे सगळे रंग कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी संबंधित आहेत. शनी आणि राहू ग्रहाला शांत करण्यासाठी निळ्या, ब्राऊन किंवा काळ्या रंगाचे चपला-बूटं वापरणं शुभ ठरेल.                                                                                          

हे ही वाचा :                                                                     

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Astrology Jyotirlinga : आयुष्य बदलायचं असेल तर वृषभ राशीने सोमनाथ, धनु राशीने काशीला जावं; कोणत्या राशीच्या लोकांनी कुठल्या ज्योतिर्लिंगाला जावं?