Astrology Jyotirlinga : आयुष्य बदलायचं असेल तर वृषभ राशीने सोमनाथ, धनु राशीने काशीला जावं; कोणत्या राशीच्या लोकांनी कुठल्या ज्योतिर्लिंगाला जावं?

Astrology : ज्योतिष शास्त्रानुसार, 12 ज्योतिर्लिंगांपैकी प्रत्येक ज्योतिर्लिंग कोणत्या ना कोणत्या राशीला समर्पित आहे.

Astrology

1/14
ज्याप्रमाणे 12 राशी आहेत त्याचप्रमाणे 12 ज्योतिर्लिंग आहेत. आणि प्रत्येक ज्योतिर्लिंग कोणत्या ना कोणत्या राशीला समर्पित आहे. तुमच्या राशीला अनुसरुन कोणतं ज्योतिर्लिंग आहे ते जाणून घेऊयात.
2/14
मेष रास - रामेश्वरम. रामेश्वरम हे भारताच्या तामिळनाडू राज्यातील एक शहर आहे, जिथे रामनाथस्वामी मंदिर आहे.
3/14
वृषभ रास - सोमनाथ. सोमनाथ हे शिवाच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी पहिले ज्योतिर्लिंग असून, हे गुजरात राज्यातील वेरावळ जवळील प्रभास पाटण येथे स्थित आहे.
4/14
मिथुन रास - नागेश्वर. नागेश्वर ज्योतिर्लिंग हे भगवान शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे, जे गुजरात राज्यातील द्वारकाजवळ आहे.
5/14
कर्क रास - ओंकारेश्वर. ओंकारेश्वर हे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील एक प्रसिद्ध ज्योतिर्लिंग आहे. हे मंदिर नर्मदेच्या काठावर स्थित आहे आणि त्याचा आकार 'ॐ' सारखा आहे, म्हणूनच त्याला ओंकारेश्वर असे नाव आहे.
6/14
सिंह रास - वैजनाथ. परळी वैजनाथ हे भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. हे महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात आहे. या ज्योतिर्लिंगाला भगवान शंकर 'वैद्यनाथ' या नावाने पूजले जातात.
7/14
कन्या रास - मल्लिकार्जुन. मल्लिकार्जुन हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी दुसरे आहे आणि हे श्रीशैल्य पर्वतावर कृष्णा नदीच्या काठी आंध्र प्रदेशात आहे.
8/14
तूळ रास - महाकालेश्वर. महाकालेश्वर ज्योतिर्लिंग हे भगवान शंकराचे एक प्रसिद्ध मंदिर आहे. हे मंदिर भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील उज्जैन शहरात आहे.
9/14
वृश्चिक रास - घृष्णेश्वर. घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग हे महाराष्ट्रातील वेरूळ गावी (छत्रपती संभाजीनगर) असलेले एक प्रसिद्ध हिंदू मंदिर आहे.
10/14
धनु रास - काशी. काशी विश्वनाथ मंदिर हे भगवान शंकराला समर्पित आहे. उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे असलेले हे एक प्रसिद्ध हिंदू मंदिर आहे.
11/14
मकर रास - भीमाशंकर. भीमाशंकर हे भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. भीमा नदीच्या उगमस्थानाजवळ हे ज्योतिर्लिंग आहे. हिंदू धर्मातील पवित्र स्थान आहे.
12/14
कुंभ रास - केदारनाथ. केदारनाथ मंदिर हे भगवान शंकराचे एक हिंदू मंदिर आहे. हे मंदिर उत्तराखंड राज्यातील केदारनाथ गावात मंदाकिनी नदीच्या काठावर बांधले गेले आहे. केदारनाथ हिंदू धर्मातील सर्वात पवित्र स्थानांपैकी एक आहे.
13/14
मीन रास - त्र्यंबकेश्वर. त्र्यंबकेश्वर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एक गाव आहे.
14/14
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Sponsored Links by Taboola