Indus water treaty: पाकिस्तानचे प्रधानमंत्री शहाबाज शरीफ यांनी जागतिक व्यासपीठावर भारताने सिंधू पाणी करार स्थगित केल्याचा आरोप केल्यानंतर नवी दिल्लीतून भारताने शरीफ यांच्या आरोपावर चोख प्रत्युत्तर दिले आहे. नवी दिल्लीतून पाकिस्तानच्या प्रतिक्रियेवर भारताने शनिवारी एक प्रतिक्रिया दिली . सिंधू पाणी कराराचे उल्लंघन केल्याबद्दल आम्हाला दोष देणं पाकिस्तानने थांबवावं . कारण सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादामुळे सिंधू पाणी करार  सुरू ठेवण्यात अडथळे निर्माण होत असल्याचं भारताने म्हटलंय . (New Delhi)

शहाबाज शरीफ काय म्हणाले?

तजाकिस्तानमध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या हिमनदी संवर्धन परिषदेत (ग्लेशियर संरक्षण राष्ट्रीय परिषद ) पाकिस्तानचे प्रधानमंत्री शहाबाद शरीफ यांनी भारताच्या सिंधू कराराला पाण्याचे हत्यार बनवत एकतर्फी आणि बेकायदेशीर शस्त्र म्हणून संबोधले होते .संकुचित राजकीय स्वार्थासाठी लाखो लोकांचे जीवन ओलिस ठेवू नये ,असे पंतप्रधान शहाबाज शरीफ म्हणाले होते .

भारताने काय प्रत्युत्तर दिलं?

केंद्रीय मंत्री कीर्तीवर्धन सिंह पाकिस्तानच्या या प्रतिक्रियेवर म्हणाले, पाकिस्तान स्वतः दहशतवादाच्या माध्यमातून  कराराचे उल्लंघन करत आहे . पाकिस्तानी व्यासपीठाचा गैरवापर करून व्यासपीठाच्या कक्षेत येत नसलेले मुद्दे उपस्थित करणेही चुकीचा आहे 'पाकिस्तानच्या या प्रयत्नांचा मी तीव्र निषेध करतो असे केंद्रीय मंत्री कीर्तीवर्धन सिंह म्हणालेत .

जम्मू आणि काश्मीर मधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधू पाणी करार स्थगित केला होता . सिंधू नदीत एकतर पाणी वाहील किंवा रक्ताचे पाट वाहतील अशी धमकी पाकिस्तान कडून आल्यानंतरही भारताने सिंधूचे पाणी आणि रक्त एकत्र वाहू शकत नाही .या दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप लोकांना त्यांचा धर्म विचारून मारण्यात आले .

'आता परिस्थिती बदलली आहे'

कीर्तीवर्धन सिंह म्हणाले ,सिंधू नदी करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर तांत्रिक लोकसंख्या आणि हवामान बदल तसेच सीमापार दहशतवादाच्या धोक्यामुळे आता परिस्थिती बदलली आहे .ते म्हणाले , ' पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांमुळे भारताच्या सिंधू नदी कराराचा फायदा घेण्याच्या क्षमतेत आता अडथळे निर्माण झाले आहेत .पाकिस्तानी भारतावर दोषारोप करणे थांबवावे .सिंधू पाणी करार सद्भावना आणि मैत्रीच्या भावनेने करण्यात आला होता आणि त्याचा आदर करणे आवश्यक आहे .त्यांनी स्पष्ट केले की या कराराचे उल्लंघन करणारा पक्ष हा स्वतः पाकिस्तान आहे .पाकिस्तान वाद वाढवत असल्याचेही त्यांनी सांगितले .

हेही वाचा:

Shehbaz Sharif: 'आपल्या मित्र देशांनाही वाटत नाही की पाकिस्तानने भीक मागावी, पण..', पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची पुन्हा मोठी कबुली