Ashadhi wari 2024:टाळ मृदंगाच्या गजरात ज्ञानदेवांच्या पादुकांना आज नीरास्नान (Nirasnan) होणार आहे. ‘माऊली माऊली’च्या जयघोषात संत ज्ञानेश्वरांचा पालखी सोहळा आज वाल्हेवरून निघाला आहे. निरामधील दत्तघाटावर माऊली महाराजांच्या पादुकांना स्नान घातलं जाईल आणि इथून पुढे हा वैष्णवांचा मेळा (Ashadhi wari 2024) पुणे जिल्ह्यातील आपला मुक्काम आटोपून सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश करेल.
दरम्यान, वारकऱ्यांनी सकाळपासूनच दत्तघाटावर गर्दी करायला सुरुवात केली आहे. निरामधील हा दत्तघाट परिसर वारकऱ्यांनी फुलून गेला आहे.
पालखी सोहळ्यात निरास्नानाला मोठे महत्व
नीरा भिवरा पडता दृषी। स्नान करिता शुद्ध सृष्टी अंती तो वैकुंठप्राप्ती। ऐसे परमेष्ठी बोलिला।। असं म्हणत हरीनामाच्या जयघोषात आषाढी वारी पालखी यात्रा पंढरपूरच्या देशेने निघते. या सोहळ्यात माऊलींव्या पादुकांना नीरा नदीच्या पाण्यात स्नान घालतात. या स्नानाला पालखी सोहळ्यात अनन्यासाधारण महत्व आहे. आषाढी वारीत ज्ञानोबांच्या पादुकांना तीनवेळा स्नान घातले जाते. नीरा नदीतून पुणे-सोलापूर जिल्ह्याची सीमा ओलांडून देत, तेव्हा इथं पादुकांना स्नान घालण्यात यायचं. तेंव्हापासूनच्या या परंपरेत खंड पडू नये म्हणून कोरोनाशी निगडित नियमांचं पालन करून ऐतिहासिक नीरा स्नान सोहळा पार पाडण्यात आला.
माऊलींच्या पालखी सोहळ्याचे होते जंगी स्वागत
निरामधील दत्त घाटावर माऊलींच्या पालखी सोहळ्याचे जंगी स्वागत केलं जातं त्यानंतर माऊलींच्या पादुका पालखीतून बाहेर काढल्या जातात. पादुकांंचं निरा नदीच्या पाण्याने स्थान घातले जाते. गेले अनेकवर्ष या स्नानाची परंपरा सुरु आहे.
हेही वाचा: