Vastu Tips For Tulsi Plant : हिंदू धर्मात तुळशीला (Tulsi) खूप महत्त्व आहे, तुळस ही जवळपास प्रत्येक घरात आढळते. तुळशीला विष्णू देवाचं रुप मानलं जातं. शास्त्रानुसार, तुळशीमध्ये लक्ष्मी देवी निवास करते आणि तिची पूजा करणं खूप शुभ मानलं जातं. ज्योतिष आणि वास्तू या दोन्ही शास्त्रानुसार, ज्या घरात तुळशीचे रोप असते त्या घरात सुख-समृद्धी नांदते. 


मात्र, घरात तुळशीचे रोप ठेवण्याचे काही खास नियम आहेत आणि ते पाळले नाहीत तर त्याचा अशुभ परिणाम होऊ लागतो. घरात पैशाच्या समस्या उद्भवू लागतात, घरामध्ये गरिबी येते. तुळशीच्या रोपाजवळ काही गोष्टी अजिबात ठेवू नये, पण त्या गोष्टी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया


तुळशीजवळ चुकूनही ठेवू नका या वस्तू


शूज आणि चपला तुळशीजवळ ठेवू नका


तुळशीच्या रोपाजवळ शूज किंवा चप्पल ठेवल्यास तुमच्या आयुष्यात दु:ख येईल. तुळशीला लक्ष्मीचं रूप मानलं जातं, त्यामुळे तुळशीच्या रोपाजवळ शूज किंवा चप्पल अजिबात ठेवू नका. यामुळे तुळशीचा अपमान होतो, तुळशीच्या बाजूला चपला ठेवल्याने लक्ष्मीचा कोप होतो आणि अशा घरात गरिबी येते. वास्तूनुसार, तुळशीचं रोप घरात न ठेवल्यास विष्णू देवही कोपतात.


तुळशीजवळ कचऱ्याचा डबा ठेवू नका


तुळशीचं रोप अतिशय पवित्र मानलं जातं. म्हणून, जर तुम्ही तूळस घराच्या परिसरात लावत असाल तर तिच्या आसपासची जागा स्वच्छ ठेवा. तुळशीच्या बाजूला कचरा ठेवणं चांगलं नाही. तुळस ही विष्णूची लाडकी आहे आणि म्हणूनच तुळशीच्या रोपाभोवती कोणत्याही प्रकारची घाण असणं वाईट मानलं जातं आणि यामुळे आर्थिक नुकसान होऊ शकतं. त्यामुळे तुळशीजवळ कधीही डस्टबिन ठेवू नका.


तुळशीच्या रोपाजवळ झाडू ठेवू नका


हिंदू धर्मात तुळशीला फार पवित्र मानतात, त्यामुळे तुळशीजवळ चुकूनही झाडू ठेवू नये, यामुळे देवी लक्ष्मी आणि विष्णू देवाचाही अपमान होईल. तुळशीजवळ झाडू ठेवल्याने घरावर अनेक आर्थिक समस्या येतात. घरावर कर्ज वाढतं आणि हातात पैसाही टिकत नाही.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Astrology : एप्रिलमध्ये 4 ग्रहांच्या युतीमुळे बनणार चतुर्ग्रही योग; वृषभसह 5 राशी ठरणार भाग्यवान, होणार चौफेर लाभ


Numerology : खूपच लाजाळू असतात 'या' जन्मतारखेची मुलं; यांना मनातील भावनाही धड करता येत नाही व्यक्त