Vastu Shashtra: सध्या देशभरात श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त उत्साहाचं वातावरण आहे. यंदा जन्माष्टमी 16 ऑगस्टला आहे. धार्मिक मान्यतेनुसार, श्रीकृष्णाला मोराचे पंख खूप आवडतात आणि ते नेहमी डोक्यावर मोराचा मुकुट घालतात. म्हणूनच, धार्मिक दृष्टिकोनातून मोराचे पंख महत्त्वाचे आहेत, परंतु वास्तुशास्त्रात ते खूप शुभ मानले जाते. तसेच, वास्तुशास्त्रात मोराचे पंख ठेवण्यासाठी योग्य दिशा आणि ठिकाण देखील सांगितले आहे. असं म्हणतात की, श्रीमंतांच्या घरात या ठिकाणी मोराचे पंख ठेवले जातात, त्यांच्या घरी सतत पैशाचा ओघ सुरू असतो, तिजोरी नेहमीच भरलेली असते...
धन आकर्षित करण्यासाठी मोरपंख घरात कुठे ठेवतात?
मोराचे पंख अनेक घरात ठेवले जातात. काही लोक सजावटीच्या वस्तू म्हणून मोराचे पंख ठेवतात, तर काही लोक पूजागृहात मोराचे पंख ठेवतात आणि त्याची पूजा करतात. कधी कधी वेगवेगळ्या गरजांसाठी आणि वास्तुदोष दूर करण्यासाठी मोराचे पंख वेगवेगळ्या दिशेने ठेवले जातात. पण जर तुम्ही घरात आर्थिक लाभासाठी मोरपंख ठेवत असाल तर ते योग्य दिशेने आणि ठिकाणी ठेवणे महत्त्वाचे आहे. तसेच काही नियम देखील लक्षात ठेवले पाहिजेत. आर्थिक लाभासाठी मोराचे पंख कोणत्या दिशेने ठेवणे शुभ आहे? जाणून घ्या..
घरातली अशी 'ही' जागा, जिथे मोरपंख ठेवले जातात
वास्तुशास्त्रात मोराचे पंख खूप शुभ मानले जातात आणि अनेक वास्तुदोष दूर करतात. तसेच, घरात योग्य ठिकाणी ठेवलेले मोराचे पंख धन आकर्षित करते. त्यामुळे आयुष्यात वारंवार पैसे मिळण्याची शक्यता निर्माण होते. वास्तुशास्त्रानुसार, घरात मोरपंख ठेवण्यासाठी सर्वोत्तम जागा नैऋत्य आणि पूर्व दिशा आहे. यामुळे धनप्राप्तीची शक्यता निर्माण होते. घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही. तसेच, घरात नेहमीच सकारात्मक उर्जेचा प्रवाह असतो.
या गोष्टी लक्षात ठेवा
- जर तुम्ही बेडरूममध्ये मोरपंख ठेवत असाल तर लक्षात ठेवा की तुमचे पाय मोरपंख ठेवलेल्या बाजूला नसावेत. अन्यथा त्याचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होईल. तसेच घरात भांडणे वाढतील. पती-पत्नीमधील नात्यात समस्या निर्माण होतील.
- घरात कुठेही, कुठल्याही सजावटीच्या वस्तू म्हणून मोरपंख ठेवू नका. किंवा सजावट म्हणून वापरू नका. अशा पद्धतीने मोरपंख ठेवल्याने कोणताही फायदा होत नाही, उलट तो नुकसान करतो.
- मोरपंखावर कधीही इतर कोणताही रंग रंगवू नका. ते अशुभ आहे. मोराचे पंख ही एक पवित्र वस्तू आहे. कला आणि क्रिएटिव्हिटीच्या नावाखाली त्याचा अपमान करू नका.
- ज्या ठिकाणी बूट आणि चप्पल ठेवल्या जातात, बाथरूमजवळ किंवा कोणत्याही घाणेरड्या ठिकाणी मोराचे पंख ठेवण्याची चूक करू नका.
- तुमच्या जवळच्या व्यक्तीला कोणालाही कधीही मोराचे पंख भेट देऊ नका. असे केल्याने तुमच्या घराची सकारात्मक ऊर्जा दुसऱ्याच्या घरी जाते. संपत्ती कमी होऊ लागते.
हेही वाचा :
Numerology: गरिबीत जन्म असूनही फरक पडत नाही! 'या' जन्मतारखेचे लोक 35 वयानंतर कोट्याधीशच बनतात, ज्यांचा स्वामी शनिदेव, त्यांना कशाची भीती..
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)