Vastu Shashtra: वास्तुशास्त्र हे एक प्राचीन भारतीय शास्त्र आहे, जे मानवी जीवनात एखाद्या वास्तूची स्थापना, बांधणी आणि सुसंवादीपणे व्यवस्था करण्यासाठी उपयुक्त आहे. वास्तुशास्त्रानुसार दक्षिणाभिमुख घर हे अनेकदा वास्तुदोषाचे कारण मानले जाऊ शकते, परंतु याचा अर्थ असा नाही की, अशा घरांमध्ये सुख-शांती नसते. वास्तूनुसार दक्षिणाभिमुख घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी काही उपाय केले जाऊ शकतात. जर तुमचे घर दक्षिणाभिमुख असेल किंवा तुम्ही जे घर खरेदी करणार आहात, ते दक्षिणाभिमुख असेल तर तुम्ही ते घर कसे भाग्यवान बनवू शकता? हे देखील जाणून घ्या.


मुख्य दरवाजा


वास्तूनुसार मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला असणे शुभ मानले जात नाही. जर तुमच्या घराचे मुख्य प्रवेशद्वार दक्षिण दिशेला असेल तर दुसरे प्रवेशद्वार उत्तर दिशेला बनवण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे दक्षिण दरवाजाचे वास्तू दोष दूर होण्यास मदत होईल. मुख्य दरवाजावर स्वस्तिक बनवा किंवा त्यावर शुभ लाभ लिहा. मुख्य गेटच्या बाहेर तुम्ही देवी लक्ष्मीची शुभ मुर्ती स्थापित करू शकता.


भिंतीचा रंग


दक्षिणाभिमुख भिंतींवर गडद रंग वापरणे टाळा. निळा किंवा काळा रंग वापरू नका. पांंढरा, आकाशी किंवा क्रीमसारखे हलके रंग वापरणे शुभ असते. दक्षिणाभिमुख भिंत घराची सर्वात उंच भिंत असावी.


छत आणि खिडक्या


दक्षिण दिशेला जास्त खिडक्या किंवा दरवाजे बांधू नका. छताचा उतार दक्षिणेकडे तोंड करून उत्तरेकडे असावा. दक्षिणाभिमुख घरामध्ये वास्तू संतुलित करण्यासाठी दक्षिण दिशेला जास्त खिडक्या किंवा दरवाजे करू नयेत. वास्तूचे हे तत्त्व नैसर्गिक प्रकाश आणि हवेचे अभिसरण लक्षात घेऊन तयार करण्यात आले आहे. त्याच वेळी, छताचा उतार दक्षिणेकडे उत्तरेकडे असावा. असे केल्याने पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होतो आणि घराची रचना मजबूत राहते.


ब्रह्मस्थान शुद्धीकरण


वास्तुशास्त्रात घराच्या मध्यभागाला ब्रह्मस्थान मानले जाते. ही जागा नेहमी स्वच्छ ठेवली पाहिजे. वास्तू सुधारण्यासाठी, तुम्ही ब्रह्मस्थानातील भागात मातीच्या किंवा काचेच्या भांड्यात शुद्ध समुद्री मीठ ठेवू शकता. काही वेळाने हे मीठ वाहत्या पाण्यात वाहू द्यावे. असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो असे मानले जाते.


जड फर्निचर किंवा मशीन 


वास्तुशास्त्रानुसार जड फर्निचर किंवा मशीन दक्षिण दिशेला ठेवू नका. दक्षिण दिशेला स्वयंपाकघर किंवा पूजास्थान बनवू नका. तुम्ही दक्षिण दिशेला स्नानगृह बनवू शकता. ब्रह्मस्थान (घराच्या मध्यभागी) शुद्ध समुद्री मीठ ठेवून ते वाहत्या पाण्यात प्रवाहित केल्याने वास्तू दोष कमी होतो. तुम्ही काचेच्या किंवा चिकणमातीच्या भांड्यात समुद्राचे मीठ उघड्या तोंडाने भरून ते रात्रभर ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही ते वाहत्या पाण्यात फ्लश करू शकता. असे तीन दिवस करा. लक्षात ठेवा की कोणीही त्या मीठावर कोणीही पाऊल ठेवू नये.


'या' गोष्टीही महत्त्वाच्या..!


वास्तुशास्त्र सर्व समस्यांवर उपाय नाही. घरात सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी वास्तूसोबतच स्वच्छता, वायुवीजन आणि सकारात्मक विचार या गोष्टीही महत्त्वाच्या आहेत. जरी तुम्ही वास्तूमध्ये कोणतेही मोठे बदल करू शकत नसाल, तरीही तुम्ही लहान उपाय करून तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा वाढवू शकता.


हेही वाचा>>


Hindu Religion: पती-पत्नीच्या 'या' एका चुकीमुळे 'तृतीयपंथीय' मुलाचा जन्म होतो? त्यांचा जन्म कसा होतो? पुराण आणि धर्मग्रंथांत म्हटलंय..


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)