Valentine Day 2023 : आजचा दिवस प्रेमी जोडप्यांसाठी खूप खास आहे. आज व्हॅलेंटाईन डे साजरा केला जात आहे. आजच्या दिवशी लोक आपल्या जोडीदारावरील प्रेम व्यक्त करतात. एकमेकांसोबत खास वेळ घालवतात. फेंगशुई शास्त्रामध्ये अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या नात्याच्या मजबूतीसाठी चांगल्या मानल्या जातात. या दिवशी फेंगशुईशी संबंधित काही खास गोष्टी गिफ्ट केल्याने तुमच्या दोघांमधील प्रेम तर वाढेलच, पण तुमचे नाते पूर्वीपेक्षा अधिक घट्ट होईल. जाणून घ्या. (Valentine Day 2023 Gifts Fengshui Item To Partner)


 


प्रेमात असलेल्या जोडप्यांसाठी दिवस खूप खास


आज 14 फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन डे ( Valentine Day 2023) साजरा करण्यात येत आहे. हा दिवस प्रेमात असलेल्या जोडप्यांसाठी खूप खास आहे. कारण या दिवशी लोक एकमेकांवर प्रेम व्यक्त करतात. केवळ अविवाहित जोडपेच नाही, तर विवाहित लोकांमध्येही व्हॅलेंटाईन डे बद्दल खूप उत्साह असतो. हा व्हॅलेंटाइन डे काही लोकांसाठी खास असणार आहे. या दिवशी फेंगशुईच्या या गोष्टी तुमच्या पार्टनरला द्या, आणि प्रेम वाढवा


 


फेंगशुईच्या या गोष्टी तुमच्या पार्टनरला द्या


-फेंगशुईमध्ये लाफिंग बुढ्ढाला खूप शुभ मानले जाते. घरात ठेवल्याने नकारात्मकता दूर होते आणि समृद्धी वाढते. तुमचे नाते मजबूत करण्यासाठी किंवा सुखी वैवाहिक जीवनासाठी तुम्ही तुमच्या जोडीदाराला लाफिंग बुढ्ढा देऊ शकता.



-तुम्ही तुमच्या जोडीदाराला एखाद्या पक्ष्याचे चित्र भेट देऊ शकता. लक्षात ठेवा तुम्ही जे चित्र द्याल ते जोड्यांमध्ये असावे. यासोबतच पक्ष्यांमध्ये प्रेमाची भावना निर्माण झाली पाहिजे. यामुळे जोडीदारांमधील प्रेम वाढते. 



-याशिवाय राधा-कृष्णाची पेंटिंगही भेट देऊ शकता.



-या दिवशी तुम्ही तुमच्या जोडीदाराला लाल गुलाबांचा पुष्पगुच्छही देऊ शकता. ताज्या आणि सुगंधी फुलांप्रमाणेच तुमच्या नात्यातही ताजेपणा आणि सुगंध वाढेल. भेटवस्तू म्हणून पुष्पगुच्छ दिल्याने एकमेकांबद्दलचे प्रेम वाढते.



-जर तुम्ही विवाहित असाल तर तुमचे नाते मजबूत करण्यासाठी तुमच्या जोडीदाराला मॅड्रिन डकच्या जोडीचे शोपीस द्या आणि बेडरूममध्ये ठेवा. खोलीच्या नैऋत्य दिशेला ठेवा. यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनात प्रेमाचे क्षण परत येतील. 



-फेंगशुईमध्ये तीन पायांचा बेडूक खूप भाग्यवान मानला जातो. ती नेहमी ठेवल्याने जीवनात प्रगती होते. हा बेडूक तोंडात नाणी दाबून ठेवतो. ज्या घरात फेंगशुई बेडूक असतो त्या घरामध्ये संपत्तीची कमतरता नसते. 



-या दिवशी तुम्ही तुमच्या पार्टनरला हे गिफ्टही देऊ शकता.


 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


इतर बातम्या


Valentine Day 2023 Horoscope : या 6 राशींसाठी व्हॅलेंटाईन डे असेल खास, मिळेल खरे प्रेम! ज्योतिषशास्त्रात काय म्हटलंय?