Utpanna Ekadashi 2025 : हिंदू धर्मशास्त्रानुसार, सर्व व्रतांमध्ये एकादशीच्या व्रताला महत्त्वाचं स्थान देण्यात आलं आहे. नियमित एकादशीचं व्रत ठेवल्यास मनातील चंचलता संपते. तसेच, धन-संपत्ती, आरोग्य आणि सुख-शांती लाभते. ज्योतिष शास्त्रानुसार, उत्पन्ना एकादशीचं (Utpanna Ekadashi) व्रत आरोग्य, संतान सुख आणि मोक्षासाठी शुभ मानलं जातं. मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या एकादशी तिथीला हे व्रत ठेवलं जातं. त्यानुसार, उत्पन्ना एकादशीचं व्रत नेमकं 14 की 15 नोव्हेंबरला? या संदर्भात अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहेत. ते सविस्तर जाणून घेऊयात.
वातावरण तसेच, आरोग्याच्या दृष्टीने या महिन्यात फळ खाणं अनुकूल ठरतं. उत्पन्ना एकादशी का ठेवली जाते? याची तिथी कधी आणि कोणत्या दिवशी पारण होणार आहे या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घ्या.
उत्पन्ना एकादशी 2025 तिथी (Utpanna Ekadashi Tithi)
उत्पन्ना एकादशीची तिथी 15 नोव्हेंबर रोजी 12 वाजून 49 मिनिटांनी सुरु होणार आहे. तर, 16 नोव्हेंबरच्या मध्यरात्री 2 वाजून 37 मिनिटांनी हे व्रत समाप्त होणार आहे. उत्पन्ना एकादशीचं पारण 16 नोव्हेंबर 2025 रोजी रविवारी होणार आहे. याची शुभ वेळ दुपारी 1 वाजून 10 मिनिटांपासून ते 3 वाजून 18 मिनिटांपर्यंत असणार आहे.
उत्पन्ना एकादशी 2025 शुभ योग (Utpanna Ekadashi Shubh Yog)
पंचांगानुसार, यंदाची उत्पन्ना एकादशी फार खास मानली जाणार आहे. कारण या दिवशी अनेक शुभ योग जुळून येणार आहेत. या दिवशी उत्तरा फाल्गुनी नक्षत्र, विष्कुंभ योग आणि अभिजीत मूहूर्ताचा शुभ संयोग जुळून येणार आहे.
उत्पन्ना एकादशी पूजा विधी (Utpanna Ekadashi Puja)
उत्पन्ना एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे तसेच, घराची साफसफाई करावी. त्यानंतर देव्हारा स्वच्छ करा. देवाची पूजा करा. देवासमोर तुपाचा दिवा लावा. त्यानंतर भगवान विष्णूला तुलसी दलाचं पंचामृत अर्पण करा. त्यानंतर, सूर्यास्तानंतर श्रीहरी भोग चढवताना विष्णू सहस्त्रनाम तसेच, श्रीहरि स्त्रोताचं पठण करा.
उत्पन्ना एकादशीचे नियम (Utpanna Ekadashi Rules)
उत्पन्ना एकादशीचं व्रत निर्जल तसेच, फळं खाऊन किंवा पाणी पिऊन तुम्ही ठेवू शकता. तसेच, या व्रतात दशमीच्या रात्रीचं भोजन करु नये. सकाळी श्रीकृष्णाची पूजा करा आणि फळांचा नैवेद्य अर्पण करा.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)