Delhi Bomb Blast: दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या जवळ सोमवारी संध्याकाळी भीषण स्फोट झाला होता. या स्फोटात नऊ जणांचा मृत्यू झाला. हा स्फोट इतका शक्तिशाली होता की, मृतांपैकी काहीजणांच्या शरीराचे तुकडे झाले आहेत. ज्या आय 20 गाडीत हा स्फोट झाला ती गाडी डॉ. मोहम्मद उमर (Mohmmad Umar) नावाची व्यक्ती चालवत असल्याची माहिती समोर आली होती. मोहम्मद उमर हा काश्मीरमधील पुलवामा (Pulwama) येथील राहणारा होता. मोहम्मद उमर याचे जैश-ए-मोहम्मद (Jaish A Mohammad) या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचेही सांगितले जात आहे. याशिवाय, तो फरिदाबाद येथे सापडलेल्या स्फोटक प्रकरणाशी संबंधित असल्याचेही समजते. (Delhi Blast News)

Continues below advertisement


दिल्ली पोलिसांनी जवळपास 100 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील फुटेज तपासले आहे. या सगळ्यातून आय 20 कार दिल्लीत कशी आली, हे स्पष्ट झाले आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये मोहम्मद  उमर हा लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळच्या पार्किंगमध्ये गाडी लावताना आणि तिथून गाडी काढताना दिसत आहे. 


Mohmmad Umar Blast: आमची कार घराबाहेर उभी आहे, आमचा मुलगा कधी दिल्लीला गेलाच नाही; कुटुंबीयांचा दावा


दिल्ली स्फोटासाठी जी गाडी वापरण्यात आली होती, त्या गाडीचा ड्रायव्हर मोहम्मद उमर याचे जैश ए मोहम्मद संघटनेशी संबंध असल्याची माहिती समोर आली आहे. मोहम्मद उमर याच्या आय 20 कारमध्ये स्फोटकं होती, अशी माहिती सुरक्षायंत्रणांनी दिली होती. मात्र, पुलवामात राहणाऱ्या मोहम्मद उमर याच्या कुटुंबीयांनी हा दावा फेटाळला आहे. आमची कार आमच्या घराबाहेरच उभी आहे. आमची कार हरियाणा पासिंगची नव्हती. उमर हा पुलावामा येथे प्लंबिगचे काम करतो. स्फोटासाठी वापरण्यात आलेली कार आमची नाही, असे उमरच्या कुटुंबीयांनी म्हटले.


दरम्यान, स्फोटासाठी जी कार वापरण्यात आली होती त्याबाबत एक माहिती समोर आली आहे. ही गाडी सर्वप्रथम सलमान नावाच्या व्यक्तीने 2014 मध्ये खरेदी केली होती. त्याने ही गाडी ओखला येथील देवेंद्र नावाच्या व्यक्तीला विकली. त्याने ही व्यक्ती अंबाला येथील एका व्यक्तीला विकली होती. त्यानंतर या व्यक्तीने ही गाडी जम्मू काश्मीरमधील तारिक नावाच्या व्यक्तीला विकली होती, अशी माहिती समोर आली आहे.


Delhi Blast News: दिल्लीत दुसऱ्याच भागात स्फोट करायचा होता पण....


आतापर्यंत झालेल्या तपासातून दिल्ली स्फोटाविषयी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. कारमध्ये असलेल्या स्फोटकांद्वारे मध्य दिल्लीतील दुसऱ्याच भागात स्फोट घडवण्याचा कट होता. कारण मोहम्मद उमर याने लाल किल्ल्याजवळील मेट्रो स्टेशनच्या पार्किंगमधून कार काढून तो मध्य दिल्लीच्या परिसराकडे निघाला होता. परंतु, मध्येच ही कार एका सिग्नलवर थांबली आणि कारमधील स्फोटकांचा स्फोट झाला असावा. पोलीस आणि गुप्तचर यंत्रणांच्या अंदाजानुसार, मोहम्मद उमर याच्या आय 20 कारमध्ये मोठ्याप्रमाणात असलेल्या स्फोटकांमध्ये अमोनिअम नायट्रेट असावे. अमोनिअम नायट्रेटचा वापर शेतीच्या खतांसाठी केला जातो. मात्र, त्याद्वारे स्फोटकेही तयार करता येऊ शकतात.



आणखी वाचा


दिल्ली स्फोटातील 'त्या' छिन्नविछिन्न मृतदेहांचे पोस्टमार्टेम पूर्ण, पोलिसांना मिळाली महत्त्वाची माहिती, शार्पनेल ऑब्जेक्ट....