Surya Gochar 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, सूर्य ग्रहाचं (Surya Gochar) संक्रमण येत्या 16 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 1 वाजून 44 मिनिटांनी वृश्चिक राशीत होणार आहे. सूर्याने कोणत्याही राशीत प्रवेश केला तर तो एक महिन्यापर्यंत त्या राशीत स्थित असतो. त्यानुसार, 16 डिसेंबर रोजी सकाळी 4 वाजून 26 मिनिटांपर्यंत वृश्चिक राशीत असणार आहे. वृश्चिक राशी ही रहस्य, परिवर्तन, रहस्य आणि आंतरिक शक्तीची रास आहे. जेव्हा सूर्य या राशीत प्रवेश करेल तेव्हा काही राशींवर शुभ प्रभाव दिसून येईल. या लकी राशी कोणत्या ते जाणून घेऊयात. 

Continues below advertisement

सिंह रास (Leo Horoscope)

सूर्याचं वृश्चिक राशीत होणारं संक्रमण भाग्यशाली टरणार आहे. या काळात तुम्ही तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे तरच तुमची कामं मार्गी लागतील. तसेच, तुमच्यातील संवेदनशीलता दिसून येईल. नवीन संबंध निर्माण होतील. कामकाजात चांगली प्रगती होईल. 

कन्या रास (Virgo Horoscope)

कन्या राशीच्या प्रथम चरणात सूर्याचं संक्रमण होणार आहे. या काळात तुमचं व्यक्तिमत्व उठून दिसेल. तुमच्यातील आत्मविश्वास अधिक वाढलेला दिसेल. तसेच, नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी हा काळ फार शुभकारक ठरणार आहे. तणावातून तुम्हाला मुक्ती मिळू शकते. 

Continues below advertisement

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

सूर्य ग्रहाचं संक्रमण या राशीच्या लग्न भावाच्या स्थानी असेल. या काळात तुमची प्रगती दिसून येईल. बॉसकडून तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल. तसेच, वरिष्ठ सहकाऱ्यांचा तुम्हाला पाठिंबा मिळेल. पैशांची गुंतवणूक करण्यासाठी किंवा नवीन वस्तू खरेदीसाठी हा काळ उत्तम आहे. 

धनु रास (Saggitarius Horoscope)

धनु राशीच्या नवव्या चरणात हे संक्रमण होणार आहे. या काळात तुमचे प्रवासाला जाण्याचे योग जुळून येणार आहेत. नशिबाची साथ तुमच्या बरोबर असेल. तसेच, कोणत्याही गोष्टीतून तुमची नुकसान भरपाई होईल. आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. 

मीन रास (Pisces Horoscope)

वृश्चिक राशीत सूर्याचं होणारं संक्रमण मीन राशीसाठी लाभदायी ठरेल. या काळात तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली असेल. तसेच, उत्पन्नात चांगली वाढ होईल. उत्पन्नाचे नवे मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. तुम्हाला कामाच्या निमित्ताने प्रवास करावा लागेल. 

हे ही वाचा : 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Shani Margi 2025 : वर्षाच्या शेवटी शनि मार्गी होताच मालामाल होतील 'या' राशी; संकटांशी कराल दोन हात, तुमची रास यात आहे का? वाचा ज्योतिषशास्त्र