Tulsi Vivah 2024 Wishes : दिवाळीनंतर सर्वांना उत्सुकता असते ती तुळशी विवाहाची. तुळशी विवाह (Tulsi Vivah 2024) हा भारतीय संस्कृतीत सर्वात महत्त्वाचा आणि पवित्र असा सण मानला जातो. त्यानुसार, उद्या म्हणजेच 13 नोव्हेंबर रोजी तुळशी विवाह साजरा करण्यात येणार आहे. ज्याप्रमाणे दिवाळी, दसऱ्याच्या तसेच इतर सणांच्या आपण आपल्या नातेवाईकांना, आणि मित्र-परिवाराला शुभेच्छा देतो अगदी त्याच पद्धतीने आपण तुळशी विवाहाच्या देखील आपल्या नातेवाईकांना शुभेच्छा देतो. त्यामुळे या ठिकाणी आम्ही तुमच्यासाठी काही खास शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत. या शुभेच्छा संदेशांच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या नातेवाईकांना शुभेच्छा देऊ शकता. 

तुळशी विवाहाच्या शुभेच्छा संदेश 2024 : 

ज्या अंगणात तुळस आहे,तिथे देवी-देवतांचा वास आहे,ज्या घरात ही तुळस आहेते घर स्वर्गासमान आहे,तुळशी विवाहाच्या शुभेच्छा!

 

सण आनंदाचा, सण मांगल्याचासण सौख्याचा सण तुळशी विवाह पर्वाचातुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा!

 

तुळशी विवाहाच्या आनंदाने सारे जमूया एकत्रमांडव घालून घेऊया या दिवसाचा आनंदचला वाटूया अक्षता या खास क्षणासाठीसजवूया तुळशीला लावूनी कुंकवाचा टिळा मस्तकीतुळशी विवाहाच्या खूप खूप शुभेच्छा!

नमस्तुलसि कल्याणीनमो विष्णुप्रिये शुभेनमो मोक्षप्रदे देवीनम: सम्तप्रदायिकेतुलसी विवाहाच्या शुभेच्छा!

भिंतींवर सजतील दिव्यांच्या माळा...संपूर्ण घरात होईल सुंदर सजावट...तुळशी विवाहच्या निमित्तानं देतो शुभेच्छाहोवो तुमची अखंड भरभराट...तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा...

मांडव घालून घेऊया या दिवसाचा आनंदचला वाटूया अक्षता या खास क्षणासाठीसजवूया तुळशीला लावूनी कुंकूवाचा टिळा मस्तकीतुळशी विवाहाच्या खूप खूप शुभेच्छा!

तुळशीचे पानएक त्रैलोक्य समान,उठोनिया प्रात: कालीकरुया तिला वंदनआणि राखूया तिचा मानतुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा!

लगबग तुळशी विवाहाची,सोन्याचा हा दिन, लग्नासाठी तुळशी-श्रीविष्णूच्या झाले देवतांचे आगमन !तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा!

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:                                                 

Tulsi Vivah 2024 : दिवाळीनंतर तुळशी विवाह नेमका कधी? जुळून आले 2 शुभ योग, वाचा पूजेची पद्धत आणि शुभ मुहूर्त