Tulsi Vivah 2024 : वैदिक पंचांगानुसार, दरवर्षी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या द्वादशीला तुळशी विवाह (Tulsi Vivah) साजरा केला जातो. तुळशी विवाहाला देवउठनी एकादशी देखील म्हणतात. हिंदू धर्ममान्यतेनुसार, कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या द्वादशी तिथीला तुळशी विवाह केला जातो. यावर्षी तुळशी विवाह 12 नोव्हेंबर रोजी साजरा केला जाणार आहे. धार्मिक मान्यतेनुसार, काही उपाय करणं शुभ मानलं जातं. 


तुळशी विवाहाला हिंदू धर्मात फार महत्त्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी भगवान विष्णू आणि तुळशीचा विवाह झाला होता. या दिवशी विवाह केल्याने वैवाहिक जीवन सुखी राहते. सुख, समृद्धी प्राप्त होते. मान्यतेनुसार, या दिवशी पूजा केल्याने सर्व विघ्न दूर होतात. तुळशी विवाहाला देवउठनी एकादशीनंतर शुभ कार्याची सुरुवात केली जाते. 


तुळशी विवाहाच्या दिवशी 'हे' खास उपाय करा 



  • जर तुमच्या वैवाहिक जीवनात काही समस्या येत असतील तर त्या दूर होतील. तसेच, या दिवशी तुमच्या जोडीदाराबरोबर मंगलाष्टकाचं पठण करणं शुभ मानलं जातं. यामुळे आयुष्यात सकारात्मकता वाढते. 

  • या व्यतिरिक्त घरात सुख-शांती टिकवून ठेवण्यासाठी तुळशीसमोर तुपाचा दिवा लावावा. असे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. तसेच, आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळते. 

  • जर तुम्ही अखंड सौभाग्याची प्रार्थना करत असाल किंवा पुत्र प्राप्तीसाठी प्रयत्न करत असाल तर तुळशी विवाहाच्या दिवशी शालिग्राम आणि तुळशीचा विवाह करा. या विवाहाला विधीनुसार संपन्न करा. यामुळे तुमच्या जीवनात सुख-शांती टिकून राहील. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हेही वाचा :


Shukra Gochar : आज शुक्राचा धनु राशीत प्रवेश; 'या' 6 राशींना लागणार चार चॉंद, अपेक्षित फळ लवकरच मिळणार